‘कलर्स मराठी’ वाहिनीवर येत्या २२ एप्रिलपासून ‘सुख कळले’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सागर देशमुख हे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘सुख कळले’ मालिकेत प्रेक्षकांना माधव-मिथिलाच्या सुखी संसाराची गोष्ट अनुभवता येणार आहे. माधव-मिथिला या दोघांचं सुख नेमकं कशात आहे हे सांगणारी गोड मालिका म्हणजे ‘सुख कळले!’ या नव्या मालिकेसाठी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : सलमानच्या घराबाहेर गोळीबार, वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना फक्त…”
‘सुख कळले’साठी ‘रमा माधव’ मालिकेची प्रक्षेपणाची वेळ बदलण्यात आली आहे. २२ एप्रिलपासून ‘सुख कळले’ मालिका रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. नऊच्या स्लॉटला सध्या ‘रमा माधव’ मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळेच नव्या मालिकेसाठी वाहिनीने ‘रमा माधव’ मालिकेच्या प्रसारणात बदल केले आहेत.
हेही वाचा : Video : प्रार्थना बेहेरेला पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
येत्या २२ एप्रिलपासून ‘सुख कळले’ २२ एप्रिलपासून रात्री ९ वाजता आणि ‘रमा राघव’ मालिका रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. अशी माहिती कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे.