मराठी मालिकाविश्वात अशा बऱ्याच मालिका आहेत, ज्यांनी पाच ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकांनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं होतं. “चार दिवस सासूचे”, “वादळवाट”, “पुढचं पाऊल”, “देवयानी” अशा बऱ्याच मालिका होत्या, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान निर्माण केलं. पण गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिकाविश्वात अनेक मालिका काही महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. याचं कारण म्हणजे टीआरपी. मालिकेला चांगला टीआरपी नसल्यामुळे मालिका अचानक बंद होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा आणखी एका मराठी मालिकेने प्रेक्षकांचा अचानक निरोप घेतला आहे. अवघ्या तीन महिन्यातच ही मालिका गुंडाळावी लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या मंचावर अर्जुन सायलीला करणार प्रपोज, पाहा व्हिडीओ

‘आनंदाचा गंध ती कस्तुरी…जोडणाऱ्या नात्यांचा बंध ती….कस्तुरी’ असं शीर्षकगीत असलेली मालिका म्हणजेच ‘कस्तुरी’ने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. बहीण-भावाची सुंदर गोष्ट असलेली ही मालिका २६ जूनपासून सुरू झाली होती. काही काळातच प्रेक्षकांना ही मालिका आवडू लागली. समर आणि कस्तुरीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. पण अचानक ‘कस्तुरी’ ही मालिका ऑफ एअर झाली आहे. काल कस्तुरी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यासंदर्भात कलर्स मराठीच्या अधिकृत इन्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ही मालिका अचानक बंद होण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण प्रेक्षक वर्ग मात्र नाराजी व्यक्त करत आहे.

हेही वाचा – “आईचे दागिने, मैत्रिणीचे कपडे अन्…”, घराचा EMI भरण्यासाठी केतकी माटेगावकरने केली अशी बचत; म्हणाली…

कलर्सच्या या पोस्टवर ‘कस्तुरी’ मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “ज्या मालिकेचा प्रेक्षकांना कंटाळा आला आहे, त्या सोडून भलत्याच मालिका बंद करतात. फालतू मालिकेला विषय नसतांना खतपाणी घालून वाढवतात”, “‘कस्तुरी’ ऐवजी ‘भाग्य दिले तू मला’ संपवा. सर्व नकारात्मकता दाखवली जात आहे”, “अचानक का संपवली मालिका? अजून खूप कथा बाकी होती”, “संपली कशी काय? ही फालतुगिरी आहे.. वेळ बदलायचा ना… लगेच संपली का?”, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या उमटत आहेत.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला कोणते जंक फूड्स आवडतात? जाणून घ्या…

‘कस्तुरी’ या मालिकेतून नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ‘जीव झाला येडापिसा’ फेम अशोक फळदेसाई आणि एकता लब्दे ही जोडी पाहायला मिळाली होती. तसेच दुष्यंत वाघ, प्रतिक्षा जाधव असे बरीच कलाकार मंडळी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi kasturi serial off air yesterday telecast last episode pps
Show comments