Colors Marathi New Serial : छोट्या पडद्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता ‘बिग बॉस मराठी’ पाठोपाठ ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या ‘आई तुळजाभवानी’ची गाथा या नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, यामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार हे वाहिनीने उघड केलेलं नव्हतं. अखेर समोर आलेल्या प्रोमोमधून या मालिकेची प्रमुख नायिका कोण असेल हे आता सर्वांसमोर आली आहे.

‘कलर्स मराठी वाहिनी’वर ( Colors Marathi ) आता लवकरच ‘आई तुळजाभवानी’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा प्रोमो वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. “अत्याचार, विकृती, अधर्माचा विनाश करण्यासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी, अवतरली अष्टभुजा आई तुळजाभवानी! अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजाभवानी’, लवकरच आपल्या कलर्स मराठीवर…” असं या प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे.

Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
JNU plans Shivaji centre
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”
Drashti Dhami First Photo with Newborn Daughter
लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो

हेही वाचा : Bigg Boss Marathi : शिवरायांचा जयघोष करत संग्राम चौगुलेची घरात एन्ट्री! आर्या लाजली, तर अरबाज-निक्की…; पाहा प्रोमो

नेटकऱ्यांकडून कौतुक

प्रोमोमधील जबरदस्त VFX, थरार, मांडणी या गोष्टी पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूपच भारी प्रोमो आहे… अभिनेत्री तर एवढी सुंदर आहे”, “कमाल प्रोमो”, “तुळजाभवानी आईचा इतिहास पाहायला नक्कीच आवडेल. जय भवानी जय शिवाजी”, “जबरदस्त प्रोमो”, “अंगावर काटा आला” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.

Colors Marathi
Colors Marathi ( कलर्स मराठी )

हेही वाचा : Video : देशमुखांची परंपरा! बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती, घरातच विसर्जन अन्…; रितेशने मुलांना दिलेल्या संस्कारांचं सर्वत्र होतंय कौतुक

‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत प्रमुख भूमिका कोण साकारणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर नव्या प्रोमोतून याचा उलगडा झाला आहे. ‘आई तुळजाभवानी’ची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारणार आहे. पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तसेच अभिनेत्रीने कथकचंही शिक्षण घेतलं आहे. या मालिकेच्या निमित्ताने पूजा आता मालिका विश्वात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वाहिनीने ( Colors Marathi ) मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख व अन्य कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत.

Story img Loader