‘कलर्स मराठी’ वाहिनीवर कालपासून एक नवी मालिका सुरू झाली आहे. अभिनेत्री गायत्री दातार, पायल जाधव व अभिनेता अक्षय केळकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘अबीर गुलाल’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. वर्षही पूर्ण न होताच ‘काव्यांजली’ मालिका ऑफ एअर होऊन तिची जागा ‘अबीर गुलाल’ मालिकेने घेतली आहे. आता लवकरच अजून एक नवी मालिका सुरू होणार आहे; जिचं नाव आहे ‘अंतरपाट’. ‘कलर्स मराठी’च्या या आगामी नव्या मालिकेच्या हटके प्रोमोने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘कलर्स मराठी’च्या ‘अंतरपाट’ या नव्या मालिकेच्या नवा प्रोमो काल रात्री सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. “नशीबानं मांडला लग्नाचा घाट पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट…”, असं या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अभिनेत्री रेशम टिपणीस, तृष्णा चंद्रत्रे असे बरेच कलाकार पाहायला मिळणार आहेत. ‘अंतरपाट’च्या पहिल्या वहिल्या प्रोमोमध्ये हळदीचा समारंभ पाहायला मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रोमोमध्ये लग्नसोहळा दाखवण्यात आला आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

हेही वाचा – Video: हृतिक रोशनचा मुलगा झाला पदवीधर, सुझान खान व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “तुझी आई असल्याचा अभिमान…”

महत्त्वाचं म्हणजे ‘अंतरपाट’ मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये एका मोठ्या ट्विस्टचा खुलासा केला आहे. प्रोमोमध्ये गौतमी (रश्मी अनपट) व क्षितिजचा (अशोक ढगे) लग्नसोहळा होताना दिसत आहे. गौतमी नटून-थटून आनंदात लग्नमंडपात येते. तिला पाहून क्षितिजचे आई-वडील खूप आनंदी होतात. त्यानंतर मंगलाष्टका होतात. मग पुढे लग्न विधी सुरू असतानाच क्षितिज गौतमीकडे एक गोष्ट मागतो. ती गोष्ट असते घटस्फोट. भरमंडपातच क्षितीज घटस्फोटाची मागणी करतो, जे ऐकून गौतमीला धक्का बसतो. त्यामुळे आता गौतमी नक्की काय करते? घटस्फोट स्वीकारते की नाही? हे आता येत्या काळात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: ठरलं! ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार समीर परांजपे, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

‘अंतरपाट’ मालिका कधीपासून आणि कोणत्या वेळेत सुरू होणार? हे नव्या प्रोमोमधून जाहीर करण्यात आलं आहे. रश्मी अनपट व अशोक ढगे यांची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका १० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दररोज संध्याकाळी ७.३० वाजता ‘अंतरपाट’ मालिका प्रसारित होणार आहे. दरम्यान, ‘अंतरपाट’ मालिका कन्नड मालिकेचा रिमेक आहे. ‘कलर्स कन्नडा’वरील ‘अंतरपाटा’ या लोकप्रिय मालिकेचा रिमेक ही नवीन मालिका आहे.

Story img Loader