New Marathi Serial : गेल्या काही दिवसांपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनी नवनवीन मालिकांची घोषणा करताना दिसत आहे. नुकतीच ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेची घोषणा केली आहे. त्याआधी महाराष्ट्राच्या दोन गावांच्या द्वेषात फुलणार सानिका आणि सरकारची झन्नाट प्रेमकथा ‘लय आवडतेस तू मला’, ‘अशोक मा.मा’ आणि ‘बाईपण भारी रं’ या मालिकांची घोषणा करण्यात आली होती. याच नव्या मालिकांमधील ‘लय आवडतेस तू मला’चा प्रदर्शनाचा आता मुहूर्त ठरला आहे.

‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेत ‘लवंगी मिरची’ फेम अभिनेता तन्मय जक्का आणि सानिका मोजर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा ‘कलर्स’च्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवली आहे.

Colors Marathi Announces new serial lai aavdtes tu mala watch promo
Video: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेची घोषणा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”
Congress Candidates List
Congress Candidates List : मविआच्या जागा वाटपात काँग्रेस शंभरी पार, सम-समान फॉर्म्युल्यावर प्रश्नचिन्ह!
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
Supriya Sule Sunil Tingre
Supriya Sule : “…तर तुम्हाला कोर्टात खेचेन, सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस”, सुप्रिया सुळेंचा दावा
What Raj Thackeray Said About Sharad Pawar
Raj Thackeray : “आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची बोचरी टीका

हेही वाचा – “तुमची तोंडं कोण बघणार…”, अभिजीत बिचुकलेंनी ७० दिवसांत ‘बिग बॉस’ संपवण्याबद्दल लगावला टोला, म्हणाले, “घमंड, उद्धटपणा…”

‘लय आवडतेस तू मला’ मालिका १४ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. सध्या या वेळेत लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चं ५ पर्व सुरू आहे. पण हे पर्व ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘लय आवडतेस तू मला’ मलिकेच्या प्रोमोमध्ये कळशी आणि साखरगाव अशी दोनं गावं पाहायला मिळत आहेत. या दोन्ही गावातील गावकरी एका व्यक्तीला शोधत आहेत. ती व्यक्ती म्हणजेच मालिकेचा नायक आहे. मालिकेतील नायकाची एन्ट्री बुलेटवरून दमदार दाखवण्यात आली आहे. ‘बिनधास्त हात ठेव’ असं त्याच्या शर्टवर मागे लिहिलं आहे. नायक गावकऱ्यांना चकवा देऊन पळून जात असतो. यावेळी गावातली मुलं विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. हीच मुलं नायकाला वाचवण्यासाठी बोलावतात. त्यामुळे नायक मुलांच्या मदतीला धावून जातो. विहिरीत पडलेल्या मांजरीला बाहेर काढतो आणि बघतो तर मांजरी बरोबर नायिकाची एन्ट्री दाखवली आहे.

त्यानंतर सुंदर नायिकेला पाहून नायक भुरळून जातो. त्याच्या हातून विहिरीचा दोरचं सुटतो. त्यामुळे नायिका विहिरीत पडते. पण तितक्यात नायक तिला वाचवतो. ‘सुंदरी एवढी सुंदर असलं असं वाटलं नव्हतं राव”, असं नायक म्हणतो. तेव्हा नायिका म्हणते, ‘सुंदरी त्या मांजरीचं नाव आहे. खेच वर.’ त्यानंतर नायक-नायिकेची ओळख होते. ‘सानिका’ असं नायिकेच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती साखरगावाच्या साहेबरावांची मुलगी असते. तर नायक स्वतःची ओळख सरकार म्हणून करून देतो; जो कळशीचा छावा असतो. अशा या दोन गावातील रांगडी प्रेमकथा ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’च्या घरात दोन अभिजीतमध्ये रंगली गाण्याची जुगलबंदी; नेटकरी म्हणाले, “बिचुकले चुकून…”

दरम्यान, अलीकडे ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अंतरपाट’ मालिकेने प्रेक्षकांच्या अचानक निरोप घेतला. अवघ्या ७६ भागांतच या मालिकेचा गाशा गुंडाळण्यात आला. त्यानंतर अभिनेत्री स्पृहा जोशी, सागर देशमुख, स्वप्नील परांजपे, आशय कुलकर्णी, स्वाती देवल अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ‘सुख कळले’ मालिका ऑफ एअर झाली.

Story img Loader