Colors Marathi New Serial : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ संपल्यावर वाहिनीवर नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. याचे प्रोमो एक-एक करून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘आई तुळजाभवानी’, ‘लय आवडतेस तू मला’, ‘अशोक मा.मा’ या तीन मालिकांच्या प्रोमोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘कलर्स मराठी’च्या ( Colors Marathi ) या नव्या मालिकेत एकूण पाच अभिनेत्री एकत्र झळकणार आहे. यात ‘रमा माधव’ फेम अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिचा देखील समावेश आहे. तिच्या जोडीला या मालिकेत विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपलीकर, प्राजक्ता परब, आकांक्षा गाडे या चार अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
anushka pimputkar and meghan jadhav started new business
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झाली बिझनेसवुमन! ‘या’ अभिनेत्याच्या साथीने सुरू केला हटके व्यवसाय; पाहा झलक
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Nikhil Rajeshirke
‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेता निखिल राजेशिर्के अडकला लग्नबंधनात
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “मी सूरजचं पालकत्व…”, घराबाहेर जाताना पंढरीनाथ कांबळेने सांगितला मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक

पाच मैत्रिणींची भन्नाट गोष्ट

‘कलर्स मराठी’च्या ( Colors Marathi ) नव्या मालिकेत प्रेक्षकांना एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आणि रुममेट्स असणाऱ्या पाच मैत्रिणींची गोष्ट पाहायला मिळेल असं मालिकेच्या पहिल्या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ असं या मालिकेचं नाव असून पहिला प्रोमो शेअर करत वाहिनीने यावर “यांच्या मैत्रीची रंगत न्यारी, जगात भारी यांची यारी” असं कॅप्शन दिलं आहे.

Colors Marathi New Serial
Colors Marathi New Serial : ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार ‘पिंगा गं पोरी पिंगा’

एकत्र राहणाऱ्या या पाच मैत्रिणांचे स्वभाव एकमेकींशी भिन्न आहेत मात्र, मैत्रीच्या धाग्याने यांचं नातं घट्ट बांधून ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला ऐश्वर्या शेटे घराची बेल वाजवते यावेळी शेजारी राहणार्‍या स्त्रिया म्हणतात, “अजून एक नवीन एन्ट्री झाली वाटतं…दिवसभर नुसता खिदळण्याचा आवाज येत असतो.” यानंतर पुढे प्राजक्ता घराचं दार उघडते आणि ऐश्वर्याला आत घेते. ती आत गेल्यावर बाहेर चर्चा करणाऱ्या महिलांविषयी काळजी व्यक्त करते. पण, घरात आल्यावर विदिशा तिला सांगते, “इग्नोराय नमामि” यानंतर सगळ्या जणी एकत्र मिळून हसु लागतात. या पाच मैत्रिणींची गोष्ट प्रेक्षकांना ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत पाहायला मिळेल.

हेही वाचा : “रसिक मायबाप प्रेक्षकांनी…”, घराबाहेर आल्यावर पंढरीनाथ कांबळेची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “दादा Unfair…”

दरम्यान, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. आता ही नवीन मालिका नेमकी केव्हापासून सुरू होणार हे अद्याप समोर आलेलं नाही. लवकरच याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली.