Colors Marathi Serial : वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठीची चढाओढ कायम सुरू असते. त्यामुळे वाहिन्या वेगवेगळे प्रयोग करत असतात. सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर ‘स्टार प्रवाह’च्या मालिका आहेत. या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिना गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका व कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. अशातच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील एक मालिका दोन महिन्यात आपला गाशा गुंडाळणार असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘कलर्स मराठी’ ( Colors Marathi Serial ) वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली. ‘दुर्गा’ असं या नव्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत अभिनेत्री रुमानी खरे आणि अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. तर अभिनेत्री शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता प्रधान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: शत्रूचे सत्य समोर आणण्यासाठी तुळजाने केला प्लॅन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा – Video: ८ महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार, डोहाळे जेवणाचा व्हिडीओ झाला व्हायरल

अलीकडेच ‘दुर्गा’ मालिकेच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला. २६ ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा’ मालिकेतून एक नवी गोष्ट भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या ‘कलर्स मराठी’च्या ( Colors Marathi Serial ) या नव्या मालिकेची चर्चा सुरू आहे. पण सध्या ७.३० वाजता प्रसारित होत असलेली ‘अंतरपाट’ मालिकेचं काय होणार? वेळ बदलणार की बंद होणार? असा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ज्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

खात्रीलायक सुत्रानुसार, ‘अंतरपाट’ मालिकेची वेळ बदलणार नाहीये. तर मालिका ( Antarpat Serial ) प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १० जूनपासून सुरू झालेली ही मालिका दोन महिन्यातच गाशा गुंडाळणार असल्याचं समजतं आहे. या मालिकेत नशीबाने बांधलेल्या गौतमी व क्षितिजच्या नात्याची गोष्ट पाहायला मिळत होती. पण आता लवकरच ‘अंतरपाट’ मालिका ऑफ एअर होणार आहे. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ( Colors Marathi Serial )

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीबरोबर साजरे केले रक्षाबंधन, फोटो शेअर करत म्हणाला…

कन्नड मालिकेचा होता रिमेक

दरम्यान, ‘अंतरपाट’ मालिकेत ( Antarpat Serial ) अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय अभिनेत्री रेशम टिपणीस, राजन ताम्हाणे, तृष्णा चंद्रत्रे असे बरेच कलाकार पाहायला मिळाले. ‘कलर्स कन्नडा’वरील ‘अंतरपाटा’ या लोकप्रिय मालिकेचा रिमेक ‘अंतरपाट’ मालिका आहे.

Story img Loader