२३ डिसेंबरपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील मालिकांचा विशेष भाग पार पडणार आहे. यात ‘इंद्रायणी’,’पिंगा गं पोरी पिंगा’, ‘अशोक मा.मा.’, ‘#लय आवडतेस तू मला’, ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकांचा समावेश आहे.’इंद्रायणी’ या मालिकेत आनंदी इंदूच्या कीर्तनाद्वारे पैसे कमावताना दिसून येईल. तर दुसरीकडे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत एक वेगळाच धमाका झालेला पाहायला मिळेल.

‘अशोक मा.मा.’ या मालिकेत भैरवी आणि अशोक मा.मा. समोरासमोर येणार आहेत. ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सरकार सानिकाला वाचवताना दिसून येईल. ‘आई तुळजाभवानी’मध्ये शिव कन्या अशोकसुंदरीचं भूतलावर आगमन होणार आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत स्वामी लीलेची अलौकिक प्रचिती होणार आहे.

हेही वाचा – Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

‘इंद्रायणी’ या मालिकेत आनंदीबाईंनी नुकतीच इंदूची माफी मागितली असून आता दुसरं कटकारस्थान रचायला त्या सज्ज आहेत. इंदूच्या कीर्तनाच्या माध्यमातून आनंदीबाईंचा पैसे कमावण्याचा हेतू आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत वल्लरीने गुपित लपवल्याने मनोजचा राग अनावर होतो. श्वेताला मात्र त्याचं हे वागणं खटकतं आणि ती मनोजच्या कानशि‍लात लगावते. आपल्या पतीचा अपमान झाल्याचं वल्लरीला सहन होत नाही आणि ती श्वेताच्याच कानशिलात लगावते. हा सगळाच धमाका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.

हेही वाचा – लवकरच बंद होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कार्तिकी गायकवाडशी आहे खास कनेक्शन, गायिका पोस्ट करत म्हणाली….

‘अशोक मा.मा.’ या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. अशोक मा.मा. आणि भैरवी आमने-सामने आले असून मुलांसाठी त्यांच्यात एक वेगळाच लढा सुरू होणार आहे. मुलांच्या कस्टडीसाठी भैरवी न्यायाची पायरी चढायला तयार आहे तर अशोक मा.मा. देवासोबत भांडायलाही तयार आहेत. ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सानिका गॅस सुरू असलेल्या एका बंद रूममध्ये बेशुद्ध पडते. सरकार घराबाहेर असतानाही त्याला ही गडबड जाणवते आणि बॉडीगार्डचा हक्क बजावत तो येऊन तिला वाचवताना दिसेल.

हेही वाचा – “आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…

‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत प्रेक्षकांना अनेक स्वामी लीला पाहायला मिळत आहेत.अशातच आता या मालिकेत स्वामी लीलेची लोकप्रिय अशी अलौकिक प्रचिती पाहायला मिळेल. एका दगडात परब्रम्ह असू शकत नाही, अशी धारणा असणाऱ्या गणेश सोहोनी यांना एका दांपत्याचे मन राखण्यासाठी पाषाण पादुकांची पूजा करावी लागते.ही पूजा सुरू असताना त्याचं नकळत नख पाषाण पादुकांना लागतं आणि या दगडी पादुकांमधून रक्तस्त्राव होऊ लागतो. या अलौकिक घटनेनंतर त्यांच्या नास्तिक विचारसरणीला धक्का बसतो आणि स्वामींचे पादुकांमधले अस्तित्व जाणवून ते कृतकृत्य होतात. या घटनेने त्याच्या आयुष्यात घडणारा बद्दल स्वामी चरित्रातला महत्वाचा टप्पा आहे. ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत शिव कन्या अशोकसुंदरी देवीच्या भेटीला येणार आहे. पार्वतीचा एकटेपणा दूर करण्यासाठी महादेवांनी ही दैवी रचना रचली आहे.

Story img Loader