सध्या बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेताना दिसत आहेत. काही मालिका प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बंद झाल्या आहेत. तर, काही मालिकांचे कथानक पूर्ण झाल्यामुळे त्या बंद केल्या जात आहेत. आता मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा – पुरुष वर्गासाठी खास ऑफर; फक्त ‘इतक्या’ रुपयात पाहता येणार ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही लोकप्रिय मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. मध्यंतरी या मालिकेत नवं वळणं आलं. अभीचा मृत्यू दाखवण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकवर्गामध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं. पण, त्यानंतर अभी आणि लतिकाच्या चिमुकल्या मुलीची एंट्री दाखवण्यात आली आणि पुन्हा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
आता अखेर या मालिकेचं कथानक पूर्ण होत आहे. लवकरच लतिका व देवाचं लग्न दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतील कलाकारांनी शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतून आणखी एक एक्झिट; ‘या’ ज्येष्ठ कलाकाराच्या जागी दिसणार ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता
लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक आणि देवा म्हणजेच अभिनेता कुणाल धुमाळ यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे क्षण शेअर केले आहेत. ‘शेवटचा दिवस’ असं लिहीत दोघांनी फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला पावसाळ्यात खायला आवडतो कर्जतचा ‘हा’ पदार्थ; म्हणाली, “मी आणि माझी मैत्रीण…”
दरम्यान, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका कधीपासून बंद होणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. त्याचप्रमाणे या मालिकेच्या जागी दुसरी कोणती मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.