‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’. या मालिकेने अडीच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनेत्री अक्षया नाईक, समीर परांजपे, कुणाल धुमाळ, अतिशा नाईक, प्रकाश धोत्रे, गार्गी थत्ते-फुले, गौरी किरण, हृषिकेश शेलार अशी तगडी कलाकार मंडळी या मालिकेत पाहायला मिळाली होती. लतिका आणि अभिमन्यूची लव्हस्टोरी प्रेक्षकांचा खूप आवडली. त्यामुळे अजूनही लतिका, अभिमन्यू प्रेक्षकांच्या मनात अढळ आहेत. अशातच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लतिका आणि अभिमन्यू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हो, हे खरं आहे. पण लतिका-अभिमन्यू म्हणजे अक्षया नाईक आणि समीर परांजपे वेगळ्या मालिकेतून भेटीस येत नाहीयेत. तर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याबाबत ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव अमेरिकेतील चाहतीचं ‘ते’ कृत्य पाहून भारावली, किस्सा सांगत म्हणाली, “तिने माझ्या हातात…”

‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “लतिका आणि अभिमन्यूची भन्नाट लव्हस्टोरी पुन्हा एकदा येतेय तुमच्या भेटीला!” असं प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं आहे. ‘कलर्स मराठी’चा हा निर्णय अनेक प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे अजून इतर जुन्या मालिका सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका २३ डिसेंबरपासून पाहायला मिळणार असून दुपारी २ वाजता ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम साक्षी गांधीने ‘या’ अभिनेत्यासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाली, “३३ वेळा लिहून, खोडून…”

हेही वाचा – Bigg Boss: सिद्धार्थ शुक्ला, विवियन डिसेना नाही तर ‘या’ स्पर्धकाला दिलेलं मोठं मानधन, फक्त तीन दिवसांचे मिळालेले २.५ कोटी

दरम्यान, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकार आता वेगवेगळ्या मालिकेत पाहायला मिळत आहेत. हृषिकेश शेलार सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये दिसत आहे. तर ‘स्टार प्रवाह’वर समीर परांजपेची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेच प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.

Story img Loader