Bigg Boss Marathi New Season : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची नुकतीच घोषणा करण्यात आली. प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर रितेश देशमुखचा नवीन प्रोमो शेअर करत वाहिनीने १२ जुलै रोजी पाचव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरची तारीख प्रेक्षकांना सांगितली. ‘बिग बॉस मराठी’चं नवीन पर्व येत्या २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. गेल्या चार पर्वांचं होस्टिंग महेश मांजरेकरांनी केलं होतं. त्यामुळे यंदा प्रेक्षकांना रितेशच्या रुपात एक नवीन होस्ट पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड प्रीमियर २८ जुलैला रात्री ९ वाजता होणार आहे. त्यापूर्वी ‘कलर्स मराठी’वर सध्या चालू असणाऱ्या मालिकांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा : Ambani Wedding : सैफ-करीना, सोनाक्षी सिन्हा…; अंबानींच्या लग्नसोहळ्याला ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी फिरवली पाठ

कलर्स मराठीच्या दोन मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ व ‘रमा राघव’ या मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही मालिकेतील कलाकारांनी यासंदर्भात केलेल्या पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेतील मुख्य अभिनेता इंद्रनील कामत याने मालिकेची नायिका रसिकाबरोबर मेकअप रुममधील फोटो शेअर करत “सावी-अर्जुन लास्ट फ्यू डेज ग्रेटफूल कलर्स मराठी” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “शक्तिमान, अलीबाबा त्याचे ४० चोर…”, अंबानींच्या लग्नात जॉन सीनाला पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…

‘रमा राघव’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या शेटेने देखील इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत कॅप्शनमध्ये शेवटचे काही दिवस असं नमूद केलं आहे. त्यामुळे या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

रमा राघव : ऐश्वर्या शेटेची पोस्ट

हेही वाचा : “शक्तिमान, अलीबाबा त्याचे ४० चोर…”, अंबानींच्या लग्नात जॉन सीनाला पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत पार पडलेल्या पर्वांबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे, दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे, तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम, तर चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरलं होतं. आता हा नवीन पाचवा सीझन केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi these two serial will off air due to bigg boss marathi new season sva 00