लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंह नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कॉमेडीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती दररोज तिच्या यूट्युब चॅनेलवरून डेली व्लॉग सुद्धा शेअर करत असते. अशातच भारती पुन्हा एकदा गोड बातमी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – जेव्हा तुझी मंगळागौर होईल, तेव्हा? ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…

अलीकडेच भारतीनं तिच्या यूट्युब चॅनेलवर एक व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस फेम जास्मिन भसीनबरोबर दिसत आहे. याच व्हिडीओतून जास्मिननं भारती गर्भवती असल्याची हिंट दिली आहे. त्यामुळे आता भारती पुन्हा एकदा आई होणार असल्याचे तर्क-वितर्क लावले जात आहे.

हेही वाचा – राखी सावंतविरोधात खास मैत्रिणीनं केला एफआयआर दाखल; म्हणाली, “लवकरच…”

भारतीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जास्मिन तिच्या मुलाबरोबर खेळताना दिसत आहे. यावेळी भारती तिला म्हणते की, ‘तू लवकर लग्न कर.’ यावर जास्मिन म्हणते की, ‘भारती तू लवकर दुसऱ्या बाळाचा विचार कर. गोलासाठी लवकर एक छोटा भाऊ किंवा बहीण येऊ दे.’ जास्मिनच्या याच वक्तव्यामुळे भारती दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. पण यावर भारती किंवा हर्षकडून आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हेही वाचा – ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री दिसणार नव्या भूमिकेत, लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत घेणार एन्ट्री

दरम्यान, भारतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं २००८मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीझन ४’ मधून पदार्पण केलं होतं. २००९ आणि २०१०मध्ये ती ‘कॉमेडी सर्कस’मध्ये झळकली होती. त्यानंतर ती २०११मध्ये पंजाबी चित्रपट ‘एक नूर’मध्ये पाहायला मिळाली होती. मग २०१२मध्ये भारतीनं अक्षय कुमारच्या ‘खिलाडी 786’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. २०१३ मध्ये तिनं कन्नड चित्रपट ‘रंगन स्टाइल’मध्ये काम केलं. तसेच भारतीनं करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये एक कॅमियो भूमिका सुद्धा साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian bharti singh again pregnant jasmin bhasin drop hint pps