‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला विनोदी अभिनेता कपिल शर्मा सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. लवकरच त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या कार्यक्रमातील कलाकारांबद्दल भाष्य केलं आहे.
‘कॉमेडी नाइट्स विथ शर्मा’ या नावाने कपिल शर्माचा कार्यक्रम सुरु झाला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावायचे. तसेच या कार्यक्रमातून चित्रपटांचे प्रमोशनदेखील व्हायचे. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या मंडळींबरोबर काही विनोदी कलाकारदेखील असायचे जे प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे. सुनील ग्रोव्हर, कृष्ण अभिषेक, या कलाकारांनी वेगवगळ्या विनोदी भूमिका करून प्रेक्षकांची मन जिंकली होती. या कलाकारांच्या एक्झिटवर कपिल शर्माला विचारले असता तो म्हणाला, “मला आजपर्यंत कधीच असुरक्षितता वाटली नाही. मला जे चांगलं वाटलं ते मी कार्यक्रमात घेऊन आलो आहे. जेव्हा तुमचा कार्यक्रम हिट असतो तेव्हा तुम्हाला लोक बोलत असतात. आधी मी थोडा तापट आहे. त्यामुळे राग हा माझ्या रक्तात होताच. मात्र मी कधीच असुरक्षित कधीच नव्हतो.”
तो पुढे म्हणाला “लोक असं म्हणतात माझे त्याच्याबरोबर क्षत्रूत्व होते मात्र देवाच्या कृपेने असे कधीच झाले नाही. जे लोक सोडून गेले आहेत त्यांना विचारा त्यांना माझ्याबरोबर काम का करायचे नाही. फक्त सुनीलबरोबर भांडण झाले इतर लोकांबरोबर माझे आजही चांगले संबंध आहेत. अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.” आजतकशी बोलताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे
दरम्यान कपिलच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले असून या चित्रपटात गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत. हा चित्रपट १७ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिलचे चाहतेदेखील चित्रपटाची वाट बघत आहेत.