Sunil Pal: माझे दिल्लीजवळ अपहरण झाले होते, असा खुलासा कॉमेडियन सुनील पालने केला आहे. अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला २० लाख रुपयांची खंडणी मागितली, परंतु मित्रांच्या मदतीने अंदाजे साडेसात लाख रुपयांची व्यवस्था केली, त्यानंतर आरोपींनी सोडलं, अशी माहिती त्याने दिली आहे. अपहरण प्रकरण म्हणजे पब्लिसिटी स्टंट असे म्हणणाऱ्यांना सुनील पालने सडेतोड उत्तर दिलंय.

सुनील इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला की त्याला अमित नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. अमितने त्याला हरिद्वारमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आयोजकांनी त्यासाठी अॅडव्हान्स म्हणून काही पैसेही दिले. मग सुनील २ डिसेंबरला दिल्लीत पोहोचला. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्याआधी एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबला. तिथे स्वतःला चाहता म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना कारमध्ये धक्का देऊन बसवलं आणि तिथून अपहरण करून नेलं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?

हेही वाचा – Sunil Pal : सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर काही वेळातच पत्नी सरिताने दिली महत्त्वाची माहिती, “काही वेळापूर्वीच..”

एका दुमजली घरात नेलं अन्…

“त्यांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मला एका दुमजली घरात नेलं. तिथे इतरही लोक होते. त्यांनी मला धमकावणं सुरू केलं आणि २० लाख रुपये मागितले. माझ्याजवळ एटीएम कार्ड नाही, असं म्हटल्यावर ते पर्याय शोधू लागले. माझा फोन त्यांनी घेतला होता. मग त्यांनी माझ्या मित्रांना फोन करण्यासाठी तो परत दिला. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सोडलं. घरी जाण्यासाठी विमानाचे तिकिट काढण्यासाठी २० हजार रुपयेही दिले,” असं सुनील म्हणाला.

प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”

पुरावे फोनमधून हटवले – सुनील पाल

अपहरणकर्त्यांनी शारीरिक इजा पोहोचवली नसली तरी या घटनेने मानसिक धक्का बसला आहे. आधी याबद्दल सार्वजनिकरित्या बोलायचं ठरवलं नव्हतं, पण पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्याने हे सगळं सांगावं लागतंय, असं सुनीलने सांगितलं. “त्यांनी मला रस्त्याच्या कडेला सोडलं. मग मी ऑटो आणि मेट्रोने दिल्ली विमानतळावर गेलो. मी पोलिसांना माझ्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. ते आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपहरणकर्त्यांनी माझ्या फोनवरून सर्व कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे हटवले आहेत. त्यांनी माझी वैयक्तिक माहिती घेतली आहे. त्यांनी माझ्या मुलाच्या शाळेचे तपशील व आईचा पत्ता घेतला आहे. या घटनेनंतर मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी वाटतेय,” असं सुनील पाल म्हणाला.

हेही वाचा – चेहऱ्यावर गोड हास्य अन् ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर घेतला सेल्फी; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांचा फोटो Viral

टीका करणाऱ्यांना सुनील पालचे उत्तर

सुनील पालला या घटनेचा धक्का बसला असतानाच त्याने प्रसिद्धीसाठी हे सगळं केलं, अशी टीकाही काही लोकांनी त्याच्यावर केली. याबद्दल प्रतिक्रिया देत सुनील म्हणाला की आर्थिक व्यवहाराचे पुरावे त्यांच्या मित्रांकडे आहेत. तसेच पोलीस तक्रारही दिली आहे. “जे केलं ते फक्त प्रसिद्धीसाठी असतं तर, आम्ही पोलिसांना कधीच यात सामील केलं नसते. मी जिवंत असल्याबद्दल कृतज्ञ आहे, आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे,” असं तो म्हणाला.

अपहरणकर्त्यांनी पैसे काढण्यासाठी वेगवेगळी अकाउंट्स वापरलीत, त्यामुळे पोलीस तपासात अडचणी येत असल्याचंही सुनीलने सांगितलं.

Story img Loader