‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवण्यात यश आलं आहे. प्रेक्षक वर्ग या मालिकेवर भरभरून प्रेम करत आहे. त्यामुळे मालिका सध्या टीआरपीच्या यादीत देखील अव्वल स्थानावर पोहोचली आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेनंतर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा टीआरपीच्या यादीत दुसरा क्रमांक आहे. आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असलेल्या क्षण मालिकेत येणार असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा – Video: ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सादर केली नवी मराठी कविता; चाहते म्हणाले, “लय मस्त..”
गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक स्वराच खरं रुप मल्हार समोर यावं याची वाट पाहत होते. तो क्षण अखेर रक्षाबंधनच्या दिवशी आला. स्वराज मुलगी असल्याचं सत्य उघड झालं. पण मल्हारसमोर स्वरा त्याचीच मुलगी असल्याचं सत्य उघड होऊ नये म्हणून मोनिकाने एक डाव रचला. शुभंकरला स्वरा त्याची मुलगी असल्याचं सांगितलं. त्यामुळे स्वराला मल्हारने स्वरा शुभंकर ठाकूर अशी नवी ओळख दिली. पण आता शुभंकरसमोर स्वरा मल्हारची मुलगी असल्याचं सत्य उघड होणार आहे. याचा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘अॅनिमल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचं पोस्टर प्रदर्शित; रणबीर कपूर-रश्मिका मंदाना झळकले लिपलॉक करताना
या प्रोमोमध्ये स्वरा शुभंकरला डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावते की, मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही कोणाला सांगणार नाही. ही शपथ शुभंकर घेतो. त्यानंतर स्वरा शुभंकरला सांगते की, तुम्ही माझे बाबा नाहीयेत. मी मल्हार कामत आणि वैदहीची मुलगी आहे. हे ऐकून शुभंकर आश्चर्याचा धक्का बसतो. तो स्वराला म्हणतो की, तू आधी का सांगितलं नाहीस? तेव्हा स्वरा म्हणते की, मला मोनिका काकूने धमकी दिली आहे. हे सत्य समोर आल्यानंतर शुभंकर मल्हारकडे जातो. पण तो स्वराची खरी ओळख मल्हारला सांगतो की नाही? हे येत्या काळात समजेल.
हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलला काय झालं? हॉस्पिटलमध्ये झाली दाखल, सोशल मीडियावर लाइव्ह येऊन म्हणाली…
दरम्यान, आता मालिकेतील या नव्या ट्विस्टनंतर पुढे काय होणार? मल्हारसमोर मोनिका आणि शुभंकरच्या नात्याचं सत्य कधी उलगडणार? पिहू ही शुभंकरची खरी मुलगी असल्याचं कधी समोर येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.