छोट्या पडद्यावरील बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वापासून प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्राकडे पाहिले जाते. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. नुकतंच तेजस्वी प्रकाशला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी करण कुंद्राच्या वडिलांनी होणाऱ्या सूनेचे कौतुक केले. त्यांनाही तेजस्वीच्या या कामगिरीचा आनंद झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी २० फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात तेजस्वी प्रकाशला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीतील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. करण कुंद्रा याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. त्यावेळी त्याने त्याच्या वडिलांची प्रतिक्रियाही सांगितली.

या व्हिडीओत करण कुंद्रा हा व्हिडीओ बनवताना दिसत आहे. त्यावेळी तो त्याच्या वडिलांकडे जातो आणि त्यांना सांगतो, ऐका… तेजूला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ही आनंदाची बातमी ऐकून त्याच्या वडिलांना आनंद होतो. त्यानंतर ते म्हणतात, “तेजू… मला तुझा अभिमान आहे.” त्यावर करण ‘मलाही’ असे म्हणतो.

त्यावर त्याचे वडील म्हणतात, “याला तुझा कमी अभिमान आहे आणि मला जास्त. हा पुरस्कार चित्रपटसृष्टीचा एक अतिशय चांगला पुरस्कार आहे. हा पुरस्कार अनेक नामवंत व्यक्तींना मिळत नाही. पण ती नशीबवान आहे की तिने इतक्या कमी वयात हे यश मिळवलं आहे. देव तुझ्यावर असेच आशीर्वाद कायम ठेवू दे.”

आणखी वाचा : Dadasaheb Phalke Award 2023 : आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणबीरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

तेजस्वी प्रकाशला हा पुरस्कार ‘नागिन ६’ या मालिकेसाठी मिळाला आहे. तिने स्वत: इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘नागिन ६ ला प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार. भविष्यात अजून खूप काही करायचे आहे, असे तेजस्वी प्रकाशने म्हटले आहे.

दरम्यान यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याची चांगली धामधूम पाहायला मिळाली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि तिच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadasaheb phalke award 2023 karan kundrra father feel proud on daughter in law to be tejasswi prakash nrp