‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत सध्या नवे वळण येत असून, प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सूर्या, त्यांचे कुटुंब ज्यामध्ये तेजश्री, राजश्री, धनश्री व भाग्यश्री या चार बहिणी आहेत. तात्या त्याचे वडील आहेत आणि आता तुळजा त्यांच्या कुटुंबाचा भाग बनली आहे. त्याशिवाय सूर्याचे मामा, काजू-पुड्या हे मित्रदेखील त्याच्या कुटुंबाचा भाग असल्याचे दिसतात. दुसरीकडे डॅडींच्या घरात त्यांचा मुलगा शत्रू आहे आणि त्यांच्या दोन पत्नी आहेत. डॅडी सूर्याला एकीकडे चांगले वागवण्याचे नाटक करतात; पण त्याच्याविषयी वाईट विचार करतात. त्यातच तुळजा आणि सूर्याच्या लग्नामुळे त्यांच्यात अंतर निर्माण झाले होते. त्यामुळे या दोन्ही घरांत अबोला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून डॅडी सूर्याशी चांगले वागत होते. आता ते सूर्याशी का चांगले वागत आहेत, याचे कारण एका प्रोमोमधून समोर आले आहे.

झी मराठी वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये शत्रू आणि डॅडी यांच्यातील संभाषण पाहायला मिळत आहे. शत्रू डॅडींना म्हणतो, “म्हणजे हे सगळं नाटक होतं”, डॅडी म्हणतात, “तेजू तुमची होणार.आम्ही तिच्यासाठी स्थळ शोधून आणणार. लग्न ठरवणार आणि ते भरमांडवात मोडणार. लोक आम्हाला दोष देणार, आम्ही तुमचं नाव पुढे करणार आणि तुमचं लग्न तेजूशी लावून देणार. आनंदी आनंद गडे, सूर्याची तेजू शत्रूकडे आणि सूर्याची नाडी आमच्याकडे”, असे म्हणून डॅडी विचित्र पद्धतीने हसताना दिसत आहेत. त्याबरोबरच प्रोमोत दाखवल्याप्रमाणे मालिकेत नवीन एन्ट्री पाहायला मिळत आहे.

tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
Nitesh Chavan And Isha Sanjay
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील राजश्रीची सूर्यादादासाठी खास पोस्ट; म्हणाली, “यामुळेच मी तुला…”
sairaj kendre and his mom got emotional
Video : लाडक्या लेकाची दिवाळी सुट्टी संपली…; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील छोट्या सिम्बाच्या आईला अश्रू अनावर
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, सूर्या आणि तुळजाची डॅडी फसवणूक करणार, तेजू शत्रूची होणार..!, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “असू दे, सून किती गुणी आहे. तिच्यामुळे तुमचं पोरगं आणि तुम्ही तरी सुधाराल. आनंदी आनंदी गडे आमचं लक्ष तुमच्याकडे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “हे जर चांगलं राहून केलं असतं तरीपण सूर्यानं तेजूला सून म्हणून तुमच्या घरात दिले असते.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “डॅडी हा तुमचा प्लॅन मला आधीपासून माहीत होता; पण मी कोणालाच नाही सांगितलं.”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तुळजाला तिच्या बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर लग्न करायचे असल्याने ती सूर्याच्या मदतीने तिच्या लग्नातून पळून जाते. मात्र, सिद्धार्थ तिची फसवणूक करतो आणि तो ठरलेल्या ठिकाणी येत नाही. ती परत तिच्या घरी येते. डॅडी रागात तुळजा आणि सूर्याचे लग्न लावून देतात. आता डॅडी त्यांचा अपमानाचा बदला घेत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच शत्रूला सूर्याची बहीण तेजू आवडते, त्याला तिच्याबरोबरच लग्न करायचे आहे.

हेही वाचा: अथिया शेट्टी व केएल राहुल होणार आई-बाबा; लग्नानंतर दोन वर्षांनी करणार नव्या सदस्याचं स्वागत

दरम्यान, आता सूर्याला डॅडींचा प्लॅन कळणार का, मालिकेत पुढे काय होणार आणि नवीन एन्ट्री कोणाची आहे याबाबतदेखील प्रेक्षकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. हा नवीन चेहरा कोण हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहेत.

Story img Loader