‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तेजूचे लग्न होणार की नाही, नक्की कोणाबरोबर होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तेजूवर मोठे संकट आल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजूचा होणार नवरा लग्नातून गायब होणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तेजूच्या लग्नासाठी सर्वजण हजर आहेत. तेजू मंडपात येऊन बसली आहे. गुरूजी सांगतात की मुहुर्ताची वेळ झाली. सूर्याचे मामा त्याला विचारतात की पाहुणे कुठे आहेत? सूर्या सांगतो, “मी सगळीकडे शोधलं पाहुणे कुठेच नाहीत.” तोपर्यंत छत्री एक चिठ्ठी घेऊन येतो व मोठ्याने ओरडत सांगतो पाहुण्यांच्या खोलीत हे सापडलं. ती चिठ्ठी तो वाचतो. त्यामध्ये असे लिहिलेले असते, “तुझी आई पळून गेली आहे. उद्या लग्नानंतर तू सुद्धा पळून…”, छत्रीचे वाक्य पूर्ण होण्याआधीच तेजूला चक्कर येते. सूर्या मोठ्याने बास असे म्हणत ओरडतो. डॅडी त्याला म्हणतात, “हे आमच्यामुळे झालं, आम्ही यातून मार्ग काढतो.” पुढे पाहायला मिळते की स्वत:ला मारून घेतात. दुसरीकडे सूर्याला वडिलांना धक्का बसतो. डॅडी रडत-रडत विचारतात, कोण आहे तयार आमच्या तेजूशी लग्न करायला? हे ऐकताच एक व्यक्ती उठतो व म्हणतो, “अशा अभागी पोरीशी कोणीही लग्न करत नाही बघा. शत्रू भैय्याचं लग्न तुम्ही तिच्याशी लावून द्याल का? सांगा. हे ऐकल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “जालिंदरचा डाव यशस्वी होणार का?शत्रूशी तेजुचं लग्न होणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, डॅडींनीच हे सर्व घडवून आणले आहे. त्यांनीच समीर निकम उर्फ पिंट्याला तुरूंगातून जेलमधून पॅरोलवर सोडवून आणले होते. समीर निकम ऐन लग्नातून पळून जाणार आणि त्याजागी शत्रू तेजूबरोबर लग्न करणार असा डॅडींचा प्लॅन होता. आता डॅडींचा प्लॅन यशस्वी होताना दिसत आहे. तसेच डॅडींच्या या प्लॅनमुळे शत्रूची तेजूबरोबर लग्न करण्याची इच्छादेखील पूर्ण होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून दिसत आहे.

हेही वाचा: कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल

आता डॅडींचा प्लॅन यशस्वी होणार का, सूर्या तेजूच्या शत्रूबरोबरच्या लग्नाला होकार देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daddys plan will succeed tejus future husband will disappear from the marriage watch the promo of lakhat ek aamcha dada serial nsp