टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरचं पहिलं लग्न अभिनेता शालिन भनोटशी झालं होतं, पण लग्नानंतर काही वर्षांनी हे जोडपं वेगळं झालं. या जोडप्याला जेडन नावाचा एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर काही वर्षे दलजीत एकटीच मुलाला सांभाळत होती, पण मागच्या वर्षी तिने निखिल पटेल याच्याशी लग्न केलं होतं. आता काही महिन्यांपासून दलजीतचं दुसरं लग्नही मोडणार असल्याची चर्चा आहे.

आतापर्यंत दलजीत कौर किंवा तिचा दुसरा पती निखिल पटेल यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून लग्नाचे आणि एकमेकांसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. अशातच आता अभिनेत्रीने एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिचं ब्रेकअप झाल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

मुलांमुळे गप्प आहे दलजीत?

दलजीतने तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या लेहेंग्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये दलजीतने लिहिलं “तिने आपल्या मुलांसाठी गप्प राहायचं ठरवलं आहे. तिचं कुटुंब तिला या काळात सावरत आहे, ती वाट पाहत आहे,” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

दलजीतच्या पतीचे विवाहबाह्य संबंध?

दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “विवाहबाह्य संबंधांबद्दल तुमचे मत काय? याला जबाबदार कोण? मुलगी, नवरा की बायको?” असा प्रश्न तिने हा व्हिडीओ स्टोरीवर पोस्ट करत विचारला आहे.

daljeet kaur
दलजीत कौरची इन्स्टाग्राम स्टोरी

ही पोस्ट पाहिल्यानंतर दलजीतचे चाहते चिंतेत आहेत. लोक तिच्या व्हिडीओवर खूप कमेंट्स करत आहेत. “तू खूप स्ट्राँग आहेस आणि अनेक महिलांसाठी प्रेरणा आहेस. देव तुला आणि तुझ्या मुलाला आशीर्वाद देवो,” असं एका युजरने लिहिलं. तर, दुसऱ्या युजरने म्हटलं की, “हिंमत ठेव, तू काहीही चुकीचं केलेलं नाही हे तुला माहित आहे. हे दुसऱ्यांदा झालं आहे. तुझं मन स्वच्छ आहे व हेतू चांगले आहेत, या अनुभवामुळे खचून जाऊ नकोस.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची सख्खी बहीण दिसते अभिनेत्रींपेक्षा सुंदर, पाहा स्नेहाचे खास Photos

दलजीत कौरने १८ मार्च २०२३ रोजी एनआरआय निखिल पटेल याच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. मग ती आपल्या मुलासह केनियाला शिफ्ट झाली. जिथे ती निखिल आणि त्याच्या मुलीबरोबर राहत होती. मात्र काही महिन्यांनंतर ती भारतात परतली आणि त्यानंतर दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले. तेव्हापासून त्यांच्या नात्यात काहीच आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. याच दरम्यान आता अभिनेत्री करत असलेल्या पोस्टमुळे निखिलचे विवाहबाह्य संबंध असावेत आणि त्यामुळे यांच्या नात्यात दुरावा आला असावा, अशा चर्चा होत आहेत.

Story img Loader