Dalljiet Kaur Husband Nikhil Patel in India: टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर मागच्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीतने २०२३ मध्ये केनियातील निखिल पटेल नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. ती पतीबरोबर विदेशात स्थायिक झाली होती पण अवघ्या आठ महिन्यातच ती मुंबईला परत आली. त्यानंतर तिने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते.

दलजीत व निखिल यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. दलजीतने दावा केला होता की निखिलने लग्न स्वीकारण्यास नकार दिला होता आणि हे लग्न कायदेशीर नसून केवळ सामाजिक प्रथा असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय निखिल तिची फसवणूक करत होता, असही ती म्हणाली होती. त्यानंतर आता निखिल मुंबईत आला आहे. तो एकटाच नसून त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंडदेखील आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती

Bigg Boss Marathi : जान्हवी अन् आर्या एकमेकींना भिडल्या, जोरदार भांडणानंतर दोघींमध्ये हाणामारी, पाहा प्रोमो

निखिल पटेल गर्लफ्रेंडसह भारतात

दलजीत कौरपासून वेगळे झाल्यावर निखिल पटेल १ ऑगस्ट २०२४ रोजी त्याची गर्लफ्रेंड सफिना नजरबरोबर फिरायला मुंबईला आला आहे. दोघेही ताज लँड्स एंड याठिकाणी दिसले. टेली टॉकने या दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. जून महिन्यात निखिल व दलजीतने एकमेकांवर आरोप केले होते, त्यानंतर आता तो थेट त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

लग्नानंतर आठ महिन्यातच मायदेशी परतली दलजीत

दरम्यान, दलजीतचं पहिलं लग्न अभिनेता शालिन भनोटशी झालं होतं, पण लग्नानंतर काही वर्षांनी हे जोडपं वेगळं झालं. या जोडप्याला जेडन नावाचा एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर काही वर्षे दलजीत एकटीच मुलाला सांभाळत होती, पण नंतर ती निखिलला भेटली, दोघे प्रेमात पडले व त्यांनी १८ मार्च २०२३ रोजी मुंबईत दुसरं लग्न केलं. निखिलही घटस्फोटित असून त्याला दोन मुली आहेत. लग्नानंतर दलजीत मुलाला घेऊन पतीबरोबर केनियाला गेली. मग ती अचानक मुलाला घेऊन जानेवारी महिन्यात भारतात परत आली.

Dalljiet Kaur Husband Nikhil Patel
दलजीत कौर व निखिल पटेल यांचा लग्नातील फोटो

दिशा पाटनीच्या बहिणीने शेअर केले लष्करी गणवेशातील फोटो; भावुक कॅप्शन पाहून चाहते म्हणाले, “तुझा अभिमान वाटतो”

दलजीत कौरने स्क्रीनशॉट पोस्ट करून केले होते आरोप

दलजीतने लग्नातील फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केल्यानंतर तिचं व निखिलचं बिनसलं आहे, अशी चर्चा सुरू झाली. एकेदिवशी दलजीतने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट पोस्ट करून निखिल तिची फसवणूक करत असल्याचं म्हटलं होतं. दोघांचा वाद सोशल मीडियावर बराच काळ रंगला होता. नंतर निखिलने दलजीतचं सामान केनियातील घरातून बाहेर फेकण्याची व कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती.

Story img Loader