Dalljiet Kaur Husband Nikhil Patel in India: टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर मागच्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीतने २०२३ मध्ये केनियातील निखिल पटेल नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. ती पतीबरोबर विदेशात स्थायिक झाली होती पण अवघ्या आठ महिन्यातच ती मुंबईला परत आली. त्यानंतर तिने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दलजीत व निखिल यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. दलजीतने दावा केला होता की निखिलने लग्न स्वीकारण्यास नकार दिला होता आणि हे लग्न कायदेशीर नसून केवळ सामाजिक प्रथा असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय निखिल तिची फसवणूक करत होता, असही ती म्हणाली होती. त्यानंतर आता निखिल मुंबईत आला आहे. तो एकटाच नसून त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंडदेखील आहे.
निखिल पटेल गर्लफ्रेंडसह भारतात
दलजीत कौरपासून वेगळे झाल्यावर निखिल पटेल १ ऑगस्ट २०२४ रोजी त्याची गर्लफ्रेंड सफिना नजरबरोबर फिरायला मुंबईला आला आहे. दोघेही ताज लँड्स एंड याठिकाणी दिसले. टेली टॉकने या दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. जून महिन्यात निखिल व दलजीतने एकमेकांवर आरोप केले होते, त्यानंतर आता तो थेट त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
लग्नानंतर आठ महिन्यातच मायदेशी परतली दलजीत
दरम्यान, दलजीतचं पहिलं लग्न अभिनेता शालिन भनोटशी झालं होतं, पण लग्नानंतर काही वर्षांनी हे जोडपं वेगळं झालं. या जोडप्याला जेडन नावाचा एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर काही वर्षे दलजीत एकटीच मुलाला सांभाळत होती, पण नंतर ती निखिलला भेटली, दोघे प्रेमात पडले व त्यांनी १८ मार्च २०२३ रोजी मुंबईत दुसरं लग्न केलं. निखिलही घटस्फोटित असून त्याला दोन मुली आहेत. लग्नानंतर दलजीत मुलाला घेऊन पतीबरोबर केनियाला गेली. मग ती अचानक मुलाला घेऊन जानेवारी महिन्यात भारतात परत आली.
दलजीत कौरने स्क्रीनशॉट पोस्ट करून केले होते आरोप
दलजीतने लग्नातील फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केल्यानंतर तिचं व निखिलचं बिनसलं आहे, अशी चर्चा सुरू झाली. एकेदिवशी दलजीतने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट पोस्ट करून निखिल तिची फसवणूक करत असल्याचं म्हटलं होतं. दोघांचा वाद सोशल मीडियावर बराच काळ रंगला होता. नंतर निखिलने दलजीतचं सामान केनियातील घरातून बाहेर फेकण्याची व कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती.