Dalljiet Kaur reacts on husband Nikhil Patel Photos: टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. तिने मार्च २०२३ मध्ये केनियातील निखिल पटेलशी लग्न केलं होतं, पण अवघ्या आठ महिन्यात ते वेगळे झाले. दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, तरीही तो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन मुंबईला आला आहे. निखिलचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो पाहून दलजीतने प्रतिक्रिया दिली आहे.

दलजीत कौर आणि निखिल पटेल यांचे लग्न १८ मार्च २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडले होते. लग्नानंतर अभिनेत्री आपल्या पतीसह मुलासह केनियाला शिफ्ट झाली. मात्र जानेवारी २०२४ मध्ये ती भारतात परतली व इकडेच राहिली. काही दिवसांनी या दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. आता दलजीतला तिच्या पतीच्या कृतीमुळे अश्रू अनावर झाले आहेत.

Bollywood actress Kareena Kapoor shared a cryptic post
“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, करीना कपूरने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
Sanam Teri Kasam actress Mawra Hocane married to Pakistani actor Ameer Gilani
‘सनम तेरी कसम’च्या सरूने केलं लग्न, पाकिस्तानी अभिनेत्री मावराने निकाहचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिला सुखद धक्का
Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”

दुसऱ्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत ८ महिन्यात वेगळी झाली अभिनेत्री, आता तो गर्लफ्रेंडसह आला मुंबईत, फोटो व्हायरल

दलजीत कौर अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्री अनेक अडचणींचा सामना करत आहे. लग्नाच्या आठ महिन्यांनंतरच दलजीत तिच्या मुलासह केनियाहून भारतात आली. काही काळानंतर, अभिनेत्रीने तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. दलजीतने पतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते, त्यावर निखिलने उत्तर देत ते लग्न वैध नसल्याचं म्हटलं होतं.

धाडस असेल तरच पाहा मन हेलावणारे OTT वरील ‘हे’ तीन चित्रपट, एकावर घालण्यात आली होती बंदी!

दोघांच्या या शाब्दिक वादानंतर निखिल पटेल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला आहे. निखिल पटेल १ ऑगस्ट २०२४ रोजी त्याची गर्लफ्रेंड सफिना नजरबरोबर फिरायला मुंबईत आला आहे. दोघेही ताज लँड्स एंड याठिकाणी दिसले. टेली टॉकने या दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत दलजीतने प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्याकडे शब्द नाहीत, फक्त अश्रू आहेत जे थांबत नाहीयेत,” असं तिने या पोस्टवर लिहिलं.

Dalljiet Kaur Husband Nikhil Patel in Mumbai
दलजीत कौरची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

याशिवाय तिच्या काही मित्र-मैत्रिणींनी निखिलच्या या वागण्यावर टीका केली आहे. त्या पोस्टही दलजीतने रिशेअर केल्या आहेत. यासोबतच दलजीतने निखिलच्या वाढदिवसानिमित्त लग्नातील काही फोटोही शेअर केले आहेत.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

दरम्यान, दलजीतचं वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. तिचं पहिलं लग्न अभिनेता शालिन भनोटशी झालं होतं, पण काही वर्षात ते विभक्त झाले. त्यांना जेडन नावाचा एक मुलगा आहे. त्यानंतर तिची व निखिलची भेट झाली व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निखिलही घटस्फोटित असून त्याला दोन मुली आहेत.

Story img Loader