‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. साहेबरावांच्या एन्ट्रीनंतर मालिकेला एक वेगळं वळणं आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं देखील चांगलं मनोरंजन होत आहे. पण अशातच आता मालिकेत आणखी एक एन्ट्री झाली आहे. सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव महत्त्वाचा भूमिकेत झळकणार आहेत. तसेच त्या स्वरा व मल्हार समोर मंजुळा व वैदेहीचं सत्य समोर आणणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव ‘दाईमा’ या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. दाईमाचं मुंजळाबरोबर एक खास नातं आहे. त्यामुळे दाईमाच्या एन्ट्रीनंतर अनेक नात्यांचा खुलासा होणार आहे.

हेही वाचा – सई लोकूरच्या मुलीच्या नावाचं सिक्कीमशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या काय आहे अर्थ?

नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये मुंजळा व वैदेहीचा नात्याचा खुलासा करताना दाईमा पाहायला मिळत आहेत. प्रोमोमध्ये, स्वरा, मल्हार, मंजुळा आणि दाईमा एकत्र दिसत आहेत. यावेळी मुंजळा विचारते की, म्हणजे मला एक जुळी बहीण होती? माझ्या बहीणचं नाव काय होतं? त्यावेळेस दाईमा म्हणतात, “तुझ्या कमनशीबी बहीणचं नाव होतं वैदेही.” हे ऐकून मल्हारला धक्काच बसतो, तो म्हणतो, “माझी वैदेही.” मात्र हे सर्व पाहून स्वराला आनंद होतो आणि ती मनातल्या मनात म्हणते की, “म्हणजे मंजुळा आई माझी मावशी आहे.”

हेही वाचा – Bigg Boss 17: नॉमिनेशन टास्कमध्ये ‘बी टीम’ला एक चूक पडली महागात, थेट अंकिता लोखंडेसह ‘हे’ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी झाले नॉमिनेट

दरम्यान, मंजुळा व वैदेहीच्या नात्याचा खुलासा २१ जानेवारीच्या महाएपिसोडच्या भागात पाहायला मिळणार आहे. पण या नात्याचा खुलासा झाल्यानंतर मल्हार कोणतं पाऊल उचलतो? आणि मोनिका काय करते? हे पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dancer maya jadhav entry in tujhech mi geet gaat aahe marathi serial pps