राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना ते एकावेळी ३० ते ३५ पुरणपोळ्या आणि पातेलंभर तूप अगदी सहज खातात असा उल्लेख केला होता. याच संदर्भात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री १६ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या भागात हजेरी लावणार आहेत. या शोचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “ट्रेलरपेक्षा वाईट” रणवीर सिंह आणि आलिया भट्टचे ‘झुमका’ गाणे ऐकून नेटकरी भडकले; म्हणाले, “जुन्या गाण्याची पुन्हा…”

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमातील देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत १६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमातील काही निवडक प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहेत. यातील एका प्रोमोमध्ये उपमुख्यमंत्र्यांना पुरणपोळ्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना ते म्हणाले, “माझी पत्नी गमतीत अनेक गोष्ट बोलते आणि मला ते सहन करावं लागतं. तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज मी सगळ्यांना सांगतो मला पुरणपोळ्या एवढ्या आवडत नाहीत.” त्यांचं हे उत्तर सध्या चांगलंच चर्चेच आलं आहे.

हेही वाचा : “माझ्याजागी रणबीर कपूरचा चेहरा लावला…”; ‘अ‍ॅनिमल’च्या व्हायरल पोस्टरवर बंगाली अभिनेत्याने केलेले वक्तव्य चर्चेत

जवळपास एक वर्षापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस ३० ते ३५ पुरणपोळ्या आणि पातेलंभर तूप अगदी सहज खातात असं म्हटलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमामध्ये खुलासा केला आहे.

हेही वाचा : “माझी माणसं…”, ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर गेला पावसाळी ट्रेकला, व्हिडीओत दिसली ‘या’ अभिनेत्रीची झलक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, अमृता फडणवीस या पेशाने बँकर असून त्या गायिकाही आहेत. आजवर अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis talks about amruta fadnavis statement in khupte tithe gupte sva 00