देबिना बॅनर्जी व गुरमीत चौधरी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. लग्नाच्या ११ वर्षांनंतर गुरमीत व देबिना आईबाबा झाले. त्यांना दोन मुली आहेत. देबिना व गुरमीत दोन लेकींसह नुकतेच श्रीलंकेत फॅलिली ट्रीप एन्जॉय करण्यासाठी गेले होते. परंतु, श्रीलंकेहून परतल्यावर देबिनाला इन्फ्ल्युएन्झा बी व्हायरसची लागण झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे.

इन्फ्ल्युएन्झा बी व्हायरसची लागण झाल्यामुळे खबरदारी म्हणून देबिनाला मुलींपासून दूर राहावं लागत आहे. देबिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तीन महिन्याच्या लेकीचा फोटोही शेअर केला आहे. ताप व सर्दी ही लक्षणे दिसल्यामुळे देबिनाने वैद्यकीय चाचणी केली होती. यामध्ये तिला इन्फ्ल्युएन्झा बी व्हायरसची लागण झाल्याचं कळालं. याचा रिपोर्टही तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. देबिनाच्या आरोग्याबाबत तिच्या टीमकडून माहिती देण्यात आली आहे.

Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
HMPV Found In Mumbai
Mumbai : मुंबईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण, सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण
HMPV Virus Causes Symptoms Treatment in marathi
“HMPV विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, रुग्णालय अधिष्ठातांनी सज्ज राहणं आवश्यक”; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
What Devendra Fadnavis Said About HMPV Virus ?
Devendra Fadnavis : “HMPV व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नका, कपोलकल्पित माहितीवर विश्वास ठेवू नका”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
Hansika Motwani sister in law Muskan Nancy James files police complaint
हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात अभिनेत्री वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न
hmpv virus symptoms marathi
HMPV विषाणूची लक्षणं काय? लागण झाल्यास उपाय काय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ…
journalists were murdered or killed last year
सत्तेला प्रश्न विचारताना त्यांनी आपला जीव धोक्यात घातला…

हेही वाचा>> “ताई तुम आगे बढो…” भाजपात प्रवेश केलेल्या प्रिया बेर्डेंसाठी सुरेखा कुडची यांची पोस्ट

हेही वाचा>> ‘तू तेव्हा तशी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! चाळीशीतील अनामिका-सौरभची लव्ह स्टोरी व रोमान्समुळे मालिका होती चर्चेत

‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना देबिनाच्या मॅनेजरने तिच्या आरोग्याबाबत माहिती दिली. “देबिनाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तिचा ताप आता कमी झाला असला, तरी सर्दी व खोकला अजूनही आहे. जास्तीस जास्त पेयांचे सेवन करुन आराम करण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला आहे. देबिना लवकरच पूर्णपणे बरी होईल, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही”, असं ते म्हणाले.

हेही वाचा>> इरफान खानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याला समजलं अन्…

देबिना व गुरमीतने २०११ मध्ये लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नाच्या ११ वर्षांनंतर एप्रिल २०२२ मध्ये त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यानंतर लगेचच नऊ महिन्यांनी देबिनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. लिआना व दिविशा अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.

Story img Loader