मालिका विश्वामधील सुप्रसिद्ध जोडी म्हणजे गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी. या सेलिब्रिटी कपलला आजवर प्रेक्षकांनी, चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. या दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर गुरमीत-देबिनाने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. एप्रिलमध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा गुरमीत-देबिनाच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. दुसऱ्यांचा गरोदर असलेल्या देबिनाला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
आणखी वाचा – वर्षभरापूर्वी ४६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने आई झाली प्रिती झिंटा, अभिनेत्रीच्या जुळ्या मुलांना पाहिलंत का?
देबिनाने पुन्हा एकदा आई होण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. गुरमीत-देबिनाच्या पहिल्या मुलीचं नाव लियाना आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला मुलगी झाली असल्याचं दोघांनी खास पोस्ट शेअर करत सांगितलं.
गुरमीत-देबिनाने फोटो शेअर करत म्हटलं की, “या जगामध्ये आम्ही आमच्या मुलीचे स्वागत करत आहोत. आम्ही पुन्हा पालक झालो आहोत. वेळेपेक्षा आधीच आमच्या बाळाचा जन्म झाला आहे. तुमचा आशिर्वाद व प्रेम कायम असुद्या.”
आणखी वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”
खरं तर देबिनाने एप्रिल २०२२मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ती पुन्हा आई झाली आहे. म्हणजेच नऊ महिन्यांआधीच तिची प्रेग्नेंसी झाली आहे. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. गुरुमीत व देबिनाचं सगळेच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत आहेत.