मालिका विश्वामधील सुप्रसिद्ध जोडी म्हणजे गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी. या सेलिब्रिटी कपलला आजवर प्रेक्षकांनी, चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. या दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर गुरमीत-देबिनाने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. एप्रिलमध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा गुरमीत-देबिनाच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. आता देबिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे रुग्णालयामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – एप्रिलमध्ये दिला मुलीला जन्म, आता नऊ महिने पूर्ण न होताच दुसऱ्यांदा आई झाली देबिना बॅनर्जी, म्हणाली, “वेळेपेक्षा आधीच…”

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
parineeti chopra and raghav chadha engrossed in ganga aarti video viral
Video: गंगा आरतीत तल्लीन झाली परिणीती चोप्रा, राघव चड्ढाही होते सोबतीला, पाहा व्हिडीओ

देबिनाने पुन्हा एकदा आई होण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. नऊ महिने पूर्ण होण्याआधीच तिने बाळाला जन्म दिला. म्हणून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली देबिनाच्या मुलीला ठेवण्यात आलं होतं. आता ती रुग्णालयामधून घरी जाण्यास तयार झाली आहे.

देबिनाने रुग्णालयामधील व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर करत म्हटलं की, “आमची लाडकी लेक या जगामध्ये लवकर आली. तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना आमच्या लक्षात आहे. आता ती एकदम ठीक आहे. डॉक्टरांनी जी काही मेहनत घेतली त्यासाठी त्यांचे धन्यवाद. वडील गुरमीत व आई देबिना लेकीला घरी घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहेत.”

देबिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गुरमित आपल्या मुलीकडे अगदी प्रेमाने पाहताना दिसत आहे. खरं तर देबिनाने एप्रिल २०२२मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ती पुन्हा आई झाली आहे. म्हणजेच नऊ महिन्यांआधीच तिची प्रेग्नेंसी झाली आहे. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. गुरुमीत व देबिनाचं सगळेच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत आहेत.