अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गुरमीत चौधरीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अकरा वर्षांनी एप्रिल २०२२ मध्ये त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यानंतर लगेचच ११ नोव्हेंबरला देबिना दुसऱ्यांदा आई झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देबिना व गुरमीतने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत दुसऱ्यांदा कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. आता पहिल्यांदाच देबिनाने तिच्या मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. देबिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. लाडक्या लेकीसाठी देबिनाने खास कविताही लिहिली आहे.

हेही वाचा >> “त्याचा नम्रपणा व स्वभाव…” ‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढा यांची विकी कौशलसाठी खास पोस्ट

देबिनाने फोटोमधून तिच्या दुसऱ्या लेकीची झलक दाखविली आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी कमेंट करत देबिना व गुरमीतचं अभिनंदन केलं आहे.

हेही पाहा>> Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो

हेही वाचा >> ‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार आशुतोषच्या मैत्रिणीची एन्ट्री; अनुष्काच्या येण्याने अरुंधती निर्णय बदलणार?

गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. २०११ साली विवाहबंधनात अडकत त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर तब्बल ११ वर्षांनी देबिना व गुरमीतच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन झालं. आता पुन्हा त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याने ते आनंदी आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debina bonnerjee shared photo of gurmeet choudhary and her second girl child kak