अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गुरमीत चौधरीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर ११ नोव्हेंबरला ते दोघे जण दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. देबिनाला अकरा वर्षांनी एप्रिल २०२२ मध्ये कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यानंतर लगेचच ११ नोव्हेंबर २०२२ ला देबिना दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. देबिना तिच्या मातृत्वाबद्दल भरभरून बोलत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतेच तिने स्तनपानाबद्दल भाष्य केलं आहे. स्तनपान आणि प्रेग्नेन्सी हार्मोन याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडीओमध्ये देबिनाने भाष्य केले आहे. ती म्हणाली, “प्रेग्नेन्सी हार्मोन ही फार सुंदर गोष्ट आहे. यामुळे शरीरात बरेच सकारात्मक बदल घडतात. त्वचा उजळल्याने त्यात बराच फरक पडतो. तुमचे केसदेखील चांगले आणि दाट होतात. दिविशाच्या जन्मानंतर मी स्तनपान सुरू केले.” पाहिली मुलगी लियानाच्या वेळी तिने स्तनपान केले नव्हते.

आणखी वाचा : School Of Lies Review: लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्याचं सुमार सादरीकरण, रटाळ कथानक अन्…

यामुळे नंतर दिविशाच्या वेळी स्तनपान करण्याच्या अनुभवाबद्दलही देबिना बोलली आहे. ती म्हणाली, “स्तनपान जेव्हा सुरू होते तो एक फार सुखद अनुभव असतो, सुरुवातीच्या दिवसांत थोड्या वेदना होतात. गरोदर राहणे हे खूप सोप्पे आहे, असे मी कोणाकडूनच ऐकलेले नाही. स्तनपान करताना लहान मुलाच्या हालचालीमुळे त्रास होणं हे सहाजिक आहे. एक वर्षभर हे सहन करत स्तनपान करणे ही फार मोठी गोष्ट आहे.”

पुढे देबिना म्हणाली, “ही फार सुंदर गोष्ट आहे. यात आई आणि ते लहान मूल हरवून जाते. मुलाला स्तनपान देताना बघणे, हा अनुभव काही वेगळाच आहे. तो शब्दांत मांडता येणार नाही. मला वाटते की ही गोष्ट ईश्वर प्राप्तीसमानच आहे.” आता प्रेग्नेन्सी हार्मोन आणि दूध येणे कमी झाल्याचेही देबिनाने या व्हिडीओमध्ये स्पष्ट केले आहे. देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर २०११ मध्ये लग्न केले होते. ‘रामायण’मधील राम-सीतेच्या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले.