अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेच्या माध्यमातून दीपा घराघरांत पोहचली. आपल्या अभिनयाने दीपाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर दीपा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त दीपाने खास पोस्ट शेअर केली आहे.

आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अंकुशची पत्नी दीपानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपाने इन्स्टाग्रामवर अंकुशबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “हा दिवस माझ्या आयुष्यातील खूपच खास दिवस आहे. कारण या दिवसामुळे माझ्या आयुष्यात दोन सर्वात खास घटना घडल्या आहेत. आज तुझा वाढदिवसही आहे आणि आजच्याच दिवशी आपण लग्नदेखील केले.” यापुढे तिने “वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अहो” आणि “लग्नाच्या वाढदिवसानिमित्तही शुभेच्छा” असं म्हटलं आहे.

दरम्यान, आज अंकुशच्या वाढदिवसाबरोबरच त्याच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. दीपाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अंकुश व दीपाने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली.

हेही वाचा- “तुला २ लाथा आणि…” मेघा घाडगेने खरमरीत पोस्ट शेअर करत पुष्कर जोगला सुनावले खडेबोल

दीपाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. ‘तू चाल पुढं’मधून तिने मालिकाविश्वात पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Story img Loader