‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका सिंग(Deepika Singh) होय. या मालिकेत आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न बागळणारी ते पतीच्या साथीने ते स्वप्न पूर्ण करणारी अशी तिची भूमिका पाहायला मिळाली होती. सध्या दीपिका कर्लस टीव्हीवरील मंगल लक्ष्मी या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. आता मात्र ती तिच्या मालिकेतील भूमिकेमुळे नाही तर तिच्या डान्समुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सेटवर धडक चित्रपटातील झिंगाट गाण्यावर ठेका धरला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते अभिनेत्रीचे कौतुक करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा डान्स व्हिडीओ मंगल लक्ष्मी मालिकेच्या एका सीनचा भाग आहे. एका सीनच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दीपिकाला पुढे काय करायचे याबद्दल माइकवरून सांगितले जात असल्याचे ऐकायला येत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला पाहायला मिळते की दीपिका एकटी डान्स करत आहे. पुढे पाहायला मिळते की स्टेजवर तिच्याबरोबर डान्सरचा एक ग्रुप तिच्याबरोबर डान्स करीत आहे.

व्हायरल भयानीने दीपिकाचा हा डान्सचा व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांना विचारले की हा डान्स करताना दीपिकान किती कॅलरीज बर्न केल्या असतील. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, स्वत:दीपिकाने यावर कमेंट केली आहे. तिने लिहिले की सकाळच्या व्यायामानेच कॅलरीज बर्न होतात.

नेटकरी काय म्हणाले?

आता या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेकविध कमेंट केल्या आहेत. काहींनी तिला वेड्यासारखा डान्स केल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिच्या दिया और बाती हम मधील मालिकेचा संदर्भ देत तिची सासू तिला रागवेल असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “भाभो खरंच म्हणत होती, सूरज तुझी बायको वेडी आहे. आज बघितले”, तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “वाह! मस्त, अशाच पाठिंब्याने ज्याला डान्स येत नाही, तोही डान्स करेल”, एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप मस्त अभिनय केला आहे. यावरून कळते की अभिनेत्रींना मालिकेत काम करताना किती संघर्ष करावा लागतो.”

दिया और बाती हम या मालिकेनंतर अभिनेत्रीने मंगल लक्ष्मी या मालिकेतून पुनरागमन केले आहे. दिया और बाती हम प्रमाणेच या मालिकेतील दीपिकाची भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. या मालिकेला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी बोलताना दीपीकाने एका मुलाखतीत म्हटले होते की इतक्या वर्षानंतर प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. चाहत्यांना आम्ही केलेले काम आवडते हीच मोठी पोचपावती आहे. असे म्हणत तिने प्रेक्षकांप्रति आभार मानले होते.