‘शार्क टँक इंडिया’ हा कार्यक्रम त्याच्या तिसऱ्या सीझनमुळे पुन्हा चर्चेत आहे. सोमवार २२ जानेवारी २०२४ पासून हा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. याचे दोन भाग आत्तापर्यंत प्रसारित झाले आहेत. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच या सीझनचीही प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. तिसऱ्या सीझनमध्येसुद्धा प्रेक्षकांना नवीन उद्योजक शार्कच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यापैकीच एक नवा शार्क म्हणजे ‘झोमॅटो’ व ‘ब्लींकइट’चे संस्थापक दीपिंदर गोयल यांचीही चर्चा होत आहे.

अमन गुप्ता, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनीता सिंग, अमित जैन यांच्यासह या सीझनमध्ये दीपिंदर गोयल यांचीही एंट्री झाली आहे. पहिल्याच भागात दीपिंदर गोयल यांना प्रेक्षकांनी पसंत केलं असून त्यांची तुलना थेट पहिल्या सीझनमधल्या अशनीर ग्रोव्हरशी केली आहे. पहिल्या सीझनमध्ये अशनीरची लोकप्रियता चांगलीच होती, सडेतोड मत मांडणं आणि समोर येणाऱ्या होतकरू उद्योजकांना वास्तवाची जाणीव करून देणं यासाठी अशनीर लोकप्रिय होता. आता त्याचीच गादी दीपिंदर गोयल तिसऱ्या सीझनमध्ये चालवणार असल्याचं म्हंटलं जात आहे.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
Bollywood Actress parineeti chopra Life Story
९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

आणखी वाचा : “गेली चार दशकं…” ‘फायटर’च्या प्रमोशनदरम्यान हृतिकचे वक्तव्य ऐकताच अनिल कपूर यांना अश्रु अनावर

प्रेक्षक असं का म्हणत आहेत? तर पहिल्याच भागात त्यांनी एक बिझनेस आयडिया पिच करायला आलेल्या जोडप्याच्या चुका सगळ्यांसमोर उघडपणे सांगितल्या. इतकंच नव्हे तर इतक्या छोट्या चुका केल्याने दीपिंदर गोयल यांनी त्यांना चांगलंच फटकारलंदेखील. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये ही गोष्ट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

‘WTF Fitness’ हा ब्रॅंड घेऊन आलेल्या जोडप्याने त्यांच्या जाहिरातीच्या बोर्डवर स्वतःचा मोबाइलनंबरच चुकीचा दिला असल्याचं दीपिंदर गोयल यांनी लक्षात आणून दिलं. त्यांच्या डिस्प्ले बोर्डवर त्यांचा मोबाइल नंबर हा ९ आकड्यांचाच दिसत होता. याबरोबरच त्यांच्या जाहिरातीत शुद्धलेखनाच्या चुकाही दीपिंदर यांनी लक्षात आणून दिल्या. एकूणच ही आयडिया पिच करायला आलेल्या या जोडप्याचा हा बेजबाबदारपणा पाहून दीपिंदर या डिलमधून बाहेर आले.

दीपिंदर म्हणाले, “तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबरमध्ये फक्त ९ आकडेच का आहेत? हे बारकावे तुमच्या लक्षात आले नाहीत? इंडियाज मोस्टमधील ‘M’ हा कॅपिटल का आहे? अशारीतीने तुम्ही ग्राहकासमोर स्वतःला सादर करणार आहात? तुम्ही टेलिव्हिजनवर झळकताय. तुम्हाला तुमच्याच प्रॉडक्टबद्दल अभिमान किंवा प्रेम नाहीये? नवा कर्मचारी घेताना जर त्याच्या रेज्युमेमध्ये एखादी छोटीशी जरी चूक निघाली तर थेट त्या व्यक्तीला दोन सेकंदात बाजूला सारलं जातं. तर मग एवढ्या चुका करून तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त वेळ का द्यायला हवा? केवळ तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर झळकताय म्हणून.”

दीपिंदर गोयल यांनी ज्या पद्धतीने त्या जोडप्याला त्यांची चूक दाखवून देऊन व्यवसायाच्या बाबतीत किती गंभीर असावं लागतं याचा धडा दिला ते पाहून प्रेक्षकांनी त्यांचं कौतुक केलं. अशनीरची जागा दीपिंदरने भरून काढली अशी कॉमेंट कित्येकांनी केली. एका युझरने लिहिलं, “अशनीरने एकदा स्वतः कबूल केलं होतं की बिझनेस हा त्याने दीपिंदर गोयलकडूनच शिकला. यावरुन आपल्याला अंदाज बांधता येईल की दीपिंदर गोयलचा अशनीरवर केवढा प्रभाव आहे.” ‘शार्क टँक इंडिया ३’ हा कार्यक्रम तुम्ही सोनी टेलिव्हिजन व सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

Story img Loader