राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांच्याविषयी न आवडणाऱ्या गोष्टी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व त्यांच्या आई सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी सांगितल्या. फडणवीसांना त्यांच्या आईने जेवणाबद्दल प्रेमळ सल्लाही दिला. आईच्या तक्रारीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
देवेंद्र फडणवीसांना पुरणपोळी नाही तर ‘हा’ पदार्थ आवडतो; म्हणाले, “मी रात्री १-२ वाजता फ्रीजमधून…”
सरिता गंगाधरराव फडणवीस म्हणाल्या, “तो (देवेंद्र फडणवीस) प्रत्येक कठीण परिस्थितीला धीरोदत्तपणे तोंड देतो आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःला सिद्ध करतो. तो २४/७ काम करत असतो. काम करताना त्याला कशाचंच भान नसतं. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला एवढं काम करायचं आहे तर तुम्ही सकाळचा नाश्ता व्यवस्थित केला पाहिजे. तुम्ही दुपारच्या जेवणात काहीतरी खाल्लं पाहिजे आणि रात्रीही आवडतं जेवण जेवायला पाहिजे. पण या कुठल्याही गोष्टी त्याच्या व्यग्रतेमुळे तो पाळू शकत नाही, याचं मला फार वाईट वाटतं. त्यामुळे ‘हम बच गए तो डुब गई दुनिया’ असं करणं योग्य नाही, आपण वाचायला हवं आणि जगालाही वाचवायला हवं.”
अमृता फडणवीसांनी खुपणाऱ्या ‘त्या’ गोष्टी सांगताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे लेक्चर…”
आईची तक्रार व सल्ल्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही बरेच लहान असताना वडील वारले, त्यामुळे घडत असताना आईचा खंबीर पाठिंबा होता. आईची मतं खूप पक्की असतात आणि महत्त्वाचं म्हणजे बरेचदा आईचं म्हणणं मला पटत नाही पण पॉलिटिकली ती करेक्ट आहे हे मला माहीत असतं. बऱ्याच परिस्थितींवरचं तिचं आकलन पूर्णपणे बरोबर असतं. त्यामुळे ती जेव्हा एखाद्या गोष्टीवर व्यक्त होते, ते मला पटलं नसलं तरी माझ्या डोक्यात असतं की ती जे म्हणतेय ते बरोबर आहे. आम्हाला तिच्यामुळेच ताकद मिळाली.”