राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व जोरदार टीका करताना दिसतात. पण अलीकडच्या काळात राजकारणी टीका करताना अर्वाच्य शब्द वापरतात, तसेच एखाद्यावर वैयक्तिक टीका करतात, त्यांची जीभ घसरते. राजकीय नेत्यांची एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केल्याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. याच संदर्भात एक प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.
देवेंद्र फडणवीस ‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. यावेळी त्यांनी अनेक अवधूत गुप्तेच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी अवधूतने त्यांना राजकीय वैर वैयक्तिक पातळीवर गेलंय, याबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळपासून सुरू झाल्याचा दावा फडणवीसांनी केला.
“सुख माणसाला मुकं बनवतं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘गेल्या १० वर्षांत राजकीय वैर अत्यंत वैयक्तिक पातळीवर गेलं. नेते अत्यंत खालच्या पातळीवर टीका करू लागले. हे तुमची सत्ता आल्यानंतर सुरू झालं, असं लोकांचं म्हणणं आहे,’ असा प्रश्न अवधूत गुप्तेने उपमुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, “मी पुराव्यांसहित सांगू शकतो की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमने जे वैयक्तिक खालची पातळी गाठली आहे, ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला वाईट कलाटणी देणारी होती.”
‘ओह माय गॉड २’मधील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांचा अक्षय कुमारला इशारा; म्हणाले, “हिंदू देवांचा…”
यावेळी अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणते विरोधक सरळ आणि कर्तव्यदक्ष वाटतात, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी हे दोघेही आपल्याला जिलेबीसारखे सरळ वाटत असल्याचं म्हटलं.