२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. शिवसेना-भाजपाची युती तुटल्यानंतर एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या सत्तास्थापनासाठी बैठका सुरू असताना अचानक अजित पवारांनी फडणवीसांबरोबर शपथ घेतल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.

“मी मुख्यमंत्री असताना अनेकदा प्रोटोकॉल तोडून…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य; म्हणाले, “मान-अपमान हे नाट्य…”

पहाटेच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीने पाठिंबा न दिल्याने देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पण आघाडी सरकार अवघे अडीच वर्षे टिकलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली आणि ते मुख्यमंत्री झाले. आता वर्षभराने अजित पवारांनी बंडखोरी केली आणि ते उपमुख्यमंत्री झाले. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपाचे सरकार आहे. या फोडाफोडीच्या राजकारणावरून बरीच टीकाही होते.

“तुम्ही रात्री खूप ॲक्टिव्ह असता…”, अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही गोष्टी रात्री…”

शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर दोनच दिवसात अजित पवारांनी काही आमदारांना बरोबर घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपा हे भ्रष्टाचारी नेत्यांना स्वच्छ करण्याचं वॉशिंग मशीन आहे. ईडीची कारवाई सुरू झाली की भाजपात गेल्यानंतर चौकशी होत नाही, भाजपा ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर करते, असे आरोप विरोधी पक्षाकडून भाजपावर सातत्याने होत असतात. ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीसांना याच संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी दिलेल्या उत्तराने लक्ष वेधून घेतलं आहे.

“मी पुराव्यांसहित सांगू शकतो की उद्धव ठाकरे…”, अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

‘भारतीय जनता पक्ष वॉशिंग मशीन आहे, ज्यामध्ये नेते गेले की स्वच्छ होऊन बाहेर येतात, असं लोकांना वाटतं,’ असा प्रश्न अवधूत गुप्तेने विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, “मी जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे, असा माझा दावा नाही. राजकारणात तडजोडी मीही करतो. शेवटी जो आदर्शवाद तुम्हाला गेमच्या बाहेर टाकेल, त्याचा फायदा नसतो. गेममध्ये राहिलात तर आदर्शवादी राहाल.”

Story img Loader