वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे व ४० आमदारांनी बंड करत सत्तेतील महाविकास आघाडी सरकार पाडलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपाला पाठिंबा दिला आणि सरकार स्थापन केलं. शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर एकदा शिंदेंनी खुलासा केला होता की ते व फडणवीस एकमेकांना मध्यरात्री भेटायचे. त्यापूर्वी २०१९ च्या निवडणुकांनंतर अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली होती. याच संदर्भात एक प्रश्न देवेंद्र फडणवीसांना ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये विचारण्यात आला. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं, ते पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सुख माणसाला मुकं बनवतं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘खुपते तिथे गुप्ते’ शोच्या आगामी एपिसोडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. या शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे, यामध्ये अवधूतने फडणवीसांना एक प्रश्न विचारला. ‘मध्यरात्री शिवसेनेचे आमदार गायब होतात आणि तुम्ही सरकार स्थापन करता. रात्री राष्ट्रवादीचे आमदार गायब होतात, तुम्ही पहाटे अजित पवारांबरोबर शपथ घेता, तुम्ही रात्री खूप अॅक्टिव्ह असता, तुम्हाला झोप येत नाही का?’ असा प्रश्न अवधूत गुप्तेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर फडणवीसांनी रात्री खूप एनर्जी असते, असं उत्तर दिलंय. फडणवीस म्हणाले, “खरंच मी रात्री जास्त अॅक्टिव्ह असतो. रात्री जास्त एनर्जी असते, कधीकधी काही गोष्टी रात्री करणं जास्त सोपं असतं, म्हणून त्या रात्री होतात.”

‘ओह माय गॉड २’मधील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांचा अक्षय कुमारला इशारा; म्हणाले, “हिंदू देवांचा…”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे मध्यरात्री एकमेकांना भेटायचे, याबद्दल अमृता फडणवीसांनीही खुलासा केला होता. “देवेंद्र हुडी घालून आणि मोठा चष्मा लावून बाहेर पडत असत. मलासुद्धा ते तेव्हा ओळखायला नाही यायचे. मी त्यांना विचारले की हे काय चालू आहे तेव्हा ते म्हणायचे काही नाही. पण मला थोडं वाटायचं की काही ना काही चालू आहे,” असं अमृता म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis talk about midnight oath taking with ajit pawar meeting eknath shinde in khupte tithe gupte hrc