छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकेचं हंगाम सुरू आहे. येत्या काळात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेसह ‘साधी माणसं’ ही मालिका सुरू होणार आहे. १८ मार्चपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘साधी माणसं’ ही मालिका सज्ज झाली. संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘साधी माणसं’ या नव्या मालिकेचं ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेबरोबर एक खास कनेक्शन आहे? ते काय आहे? जाणून घ्या…
‘साधी माणसं’ या नव्या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर व अभिनेता आकाश नलावडे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शिवानी ‘मीरा’ तर आकाश ‘सत्या’च्या भूमिकेत झळकणार आहे. मीरा ही फुलविक्रेती आहे, तर सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. एकाच शहरात राहत असले तरी दोघांचा भिन्न स्वभाव आहे. आता या दोघांची भेट कशी होणार? नियती यांच्याबरोबर काय करणार? हे या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – वर्षही पूर्ण न होता ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, जाणून घ्या…
‘साधी माणसं’ व ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांमधील खास कनेक्शन म्हणजे देविका मांजरेकर. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेची कॉस्च्युम डिझायनर देविका मांजरेकर आहे. आता ती ‘साधी माणसं’ या मालिकेच्या कॉस्च्युम डिझायनरची जबाबदारी देखील सांभाळणार आहे.
दरम्यान, देविकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने याआधी अनेक मालिकेच्या कॉस्च्युम डिझायनरची धुरा सांभाळली होती. मराठी मालिकाविश्वात देविका मांजरेकर हे खूप लोकप्रिय नाव आहे. अनेक मराठी कलाकारांच्या वेशभूषचे काम तिने उत्तमरित्या सांभाळले आहे.