‘अप्सरा आली’ या रिअ‍ॅलिटी शोमधून अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. या शोच्या विजेतेपदावर अभिनेत्रीने नाव कोरलं होतं. त्यानंतर माधुरीने ‘रानबाजार’ ही वेबसीरिज आणि ‘झी मराठी’वरील ‘देवमाणूस’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

माधुरीने नव्या वर्षानिमित्त तिच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. तिने नव्या वर्षाची सुरुवात नव्या घरात गृहप्रवेश करत केली आहे. अभिनेत्रीच्या आलिशान घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. “नमस्ते वास्तु पुरुषाय भूषाय भिरत प्रभो | मद्गृहं धन धान्यादि समृद्धं कुरु सर्वदा |” हा श्लोक माधुरीने नव्या घरासाठी शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिला आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”

हेही वाचा : Bigg Boss 17 : “मुनव्वरचा हात पकडते, मिठी मारते…”, अंकिता लोखंडे-विकी जैनमधील वाद टोकाला, नेमकं काय घडलं?

माधुरीने पारंपरिक पद्धतीने पूजा करून नव्या घरात गृहप्रवेश केला. यावेळी गृहप्रवेश समारंभाला तिचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. या व्हिडीओला दिलेल्या हॅशटॅगमध्ये अभिनेत्रीने या नव्या घराला स्वप्नपूर्ती म्हटलं आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या घराच्या दारावर ‘पवार फॅमिली’ अशी पाटी लावण्यात आली आहे.

हेही वाचा : Video: आयरा खान व नुपूर शिखरे दुसऱ्यांदा करणार लग्न, दोघांसह आमिर खान, रीना दत्ता अन् आझाद पोहोचले उदयपूरला

दरम्यान, अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्या या नव्या घराच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात”, “तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो”, “माधुरी ताई… तुम्हाला खूप खूप शुभेच्छा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी माधुरीच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader