गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार मंडळी परदेशात फिरायला जाताना दिसत आहेत. नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर ऑस्ट्रियाला फिरायला गेले आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याआधी मराठी मालिकाविश्वातील दोन लोकप्रिय कपल इंडोनेशियातील बालीला फिरायला गेले होते. किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर आणि सौरभ चौघुले-योगिता चव्हाण हे दोन कपल काही दिवसांपूर्वी बालीला गेले होते. या बाली ट्रीपवरील किरण, वैष्णवीचे अनसीन फोटो सध्या चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता किरण गायकवाडची पत्नी वैष्णवी कल्याणकरने बाली ट्रीपवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “ये….बाली”, असं कॅप्शन लिहित वैष्णवीने बालीतील खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. निळ्याशार समुद्र किनारी दोघांचे सुंदर फोटो आहेत. तसंच ATV राइट, बाली स्विंग हे अ‍ॅडव्हेंचर करतानाचे खास क्षण या फोटोमध्ये दिसत आहे. याशिवाय किरण व वैष्णवीने बालीच्या संस्कृतीविषयी जाणून घेतलं. दोघांच्या बालीचे ट्रीप फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

किरण व वैष्णवीच्या बाली ट्रीपच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. “क्यूट कपल”, “तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनला आहात”, “खूप सुंदर फोटो आहेत”, “खूप छान”, “तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता”, “दादा आणि वाहिनीने खूप मजा केली”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी १४ डिसेंबरला किरण गायकवाडचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्न झालं. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरण लग्नबंधनात अडकला. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांनी किरण व वैष्णवीच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर किरण व वैष्णवी बालीला फिरायला गेले होते.

किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर किरण वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी किरणचं ‘दर्याचं पाणी’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं आहे. याची सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच किरणने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच वैष्णवी कल्याणकरने ‘देवमाणूस’ मालिकेत काम केलं होतं. याच मालिकेदरम्यान किरण आणि तिची मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली होती.