Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Bali Trip : ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता किरण गायकवाड सध्या परदेश दौऱ्यावर आहे. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर पत्नी वैष्णवी कल्याणकरबरोबर किरण परदेशात फिरायला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून किरण इन्स्टाग्राम स्टोरीवर परदेशातील फोटो शेअर करताना दिसत आहे. नुकताच वैष्णवी कल्याणकरने परदेश दौऱ्यावरचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्यावर्षी १४ डिसेंबरला किरण गायकवाडचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्न झालं. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरण लग्नबंधनात अडकला. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांनी किरण व वैष्णवीच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर किरण व वैष्णवी इंडोनेशियातील बाली येथे फिरायला गेले आहेत. वैष्णवीने बालीतल्या ट्रीपचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर बालीमधील समुद्र किनारी, जंगलात अशा ठिकठिकाणी फिरताना दिसत आहेत. यावेळी दोघं ATV राइट, बाली स्विंग हे अ‍ॅडव्हेंचर करताना दिसत आहेत. तसंच दोघं तिथल्या संस्कृतीविषयी जाणून घेताना पाहायला मिळत आहेत. किरण व वैष्णवीच्या बाली ट्रीपचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

किरण व वैष्णवीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “ट्रीप जोरदार झाली.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “जोडी एक नंबर.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आणखीन व्हिडीओची वाट बघतोय.”

दरम्यान, किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर किरण वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकतंच किरणचं ‘दर्याचं पाणी’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं आहे. याची सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच किरणने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वैष्णवी कल्याणकरने ‘देवमाणूस’ मालिकेत काम केलं होतं. याच मालिकेदरम्यान किरण आणि तिची भेट झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली होती.

Story img Loader