‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर किरण लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. नुकतीच किरण आणि वैष्णवीला हळद लागली. त्यानंतर संगीत सोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेता किरण गायकवाडने २९ नोव्हेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. “ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’” असं जाहीर केलं होतं. किरण गायकवाडच्या या पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यानंतर अलीकडेच किरणने होणारी पत्नी वैष्णवीबरोबर पहिला रील व्हिडीओ शेअर केला; जो क्षणार्धात व्हायरल झाला. मग किरण आणि वैष्णवीने लग्नाची तारीख जाहीर केली. १४ डिसेंबरला म्हणजेच आज दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापूर्वी दोघांच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ समोर आले आहेत.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, साकारणार खलनायकाची भूमिका

संगीत सोहळ्यात किरण आणि वैष्णवीचे रोमँटिक आणि हटके डान्स पाहायला मिळाले. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष्यच्या ‘रांझना हुआ मैं तेरा’ या लोकप्रिय गाण्यावर दोघांनी डान्स केला. तसंच ‘नखरेवाली’ या गाण्यावर किरण आणि वैष्णवी थिरकले. ‘मराठी सेलिब्रिटी कट्टा’ या इन्स्टाग्राम पेजवर दोघांचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका होणार Off Air! ३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं अधिराज्य, अभिनेत्री म्हणाली…

हेही वाचा – ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “माझ्यावर कितीही रुसलीस…”

हेही वाचा – Revanth Reddy on Allu Arjun arrest: “अल्लू अर्जुन सीमेवर युद्ध लढत नाहीये, पैसे कमवतोय”, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी फायर मोडमध्ये; अटकेचं केलं समर्थन

दरम्यान, किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांची पहिली भेट ‘देवमाणूस या मालिकेच्या सेटवर झाली आणि इथे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, किरण सध्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे.

Story img Loader