Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding: ‘झी मराठी’ वाहिनीची ‘देवमाणूस’ मालिका चांगलीच गाजली. एका खेडे गावातल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या डॉ. देवीसिंगची कथेने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे ‘देवमाणूस’ मालिकेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. याच मालिकेत दोन मनं जुळली. अभिनेता किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर ‘देवमाणूस’ मालिकेत पहिल्यांदाच एकमेकांना भेटले. त्यानंतर दोघांच प्रेम जडलं आणि अखेर १४ डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात किरण आणि वैष्णवीचा लग्नसोहळा पार पडला. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बऱ्याच काळापासून किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांनी नातं लपवून ठेवलं होतं. २९ नोव्हेंबरला किरण-वैष्णवीने प्रेम जाहीर केलं. “ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’” असं कॅप्शन लिहित किरणने वैष्णवीबरोबर सुंदर फोटो शेअर केले. किरणच्या या पोस्टने चाहत्यांना सुखद धक्काच बसला. त्यानंतर किरणने लग्नाची तारीख जाहीर केली.
हेही वाचा – Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वरातीत मराठी कलाकारांचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ आला समोर
मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा किरण आणि वैष्णवीचा पाहायला मिळाला. या लग्नसोहळ्याला ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकार पाहायला मिळाले. अभिनेता अमरनाथ खराडे, निखिल चव्हाण, सुमीत पुसावळे, महेश जाधव, राहूल मगदुम आणि पूर्वा शिंदे यांनी किरण आणि वैष्णवीच्या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती लावली होती.
लग्नासाठी किरण आणि वैष्णवीने मराठी पारंपारिक लूक केला होता. अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर फेटा बांधला होता. तर वैष्णवी कल्याणकरने गडद जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. ज्यावर तिने मोजके दागिने परिधान केले होते. त्यामुळे दोघं फारच सुंदर दिसत होते. किरण आणि वैष्णवीच्या लग्नाचा व्हिडीओ ‘मराठी सेलिब्रिटी कट्टा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: पाच नॉमिनेटेड सदस्यांपैकी ‘हा’ स्पर्धक १०व्या आठवड्यात गेला घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का
हेही वाचा – Video: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवोदित कवयित्री म्हणून सन्मान, पोस्ट करत म्हणाली, “हे दुर्मिळ…”
दरम्यान, किरण गायकवाड आणि वैष्णवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे.