‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘लागिरं झालं जी’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर दोन वर्ष अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील नायक, नायिकेवर जितकं प्रेक्षकांनी प्रेम केलं. तितकंच या मालिकेतल्या खलनायकाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील हर्षवर्धन देशमुख उर्फ भैय्यासाहेब घराघरात पोहोचला. अभिनेता किरण गायकवाडने भैय्यासाहेब उत्कृष्टरित्या साकारला होता. त्यामुळे किरणला २०१८मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर किरण गायकवाडची ‘देवमाणूस’ मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली. सत्य घटनेवर आधारित असलेली या मालिकेची गूढ आणि थरारक कथा प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली होती. या मालिकेत किरण गायकवाडने डॉक्टर. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगची भूमिका निभावली होती. किरणच्या या मालिकेवर प्रेक्षकांची इतकं भरभरून प्रेम केलं की, या मालिकेचा दुसरा भागदेखील आला. असा मराठी मालिकाविश्वात लोकप्रिय किरण गायकवाड सध्या विदेशात पत्नीसह एन्जॉय करताना दिसत आहे.

गेल्यावर्षी १४ डिसेंबरला किरण गायकवाडचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्न झालं. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरण लग्नबंधनात अडकला. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर किरणचा पत्नी वैष्णवीसह विदेश दौरा सुरू आहे. याचे फोटो वैष्णवी आणि किरणने इन्स्टाग्राम शेअर केले आहेत.

इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमधील लोकेशनवरून खुलासा झाला आहे की, किरण आणि वैष्णवी सध्या इंडोनेशियामधील बाली येथे फिरत आहेत. बालीमधील दोघांचे फोटो शेअर केले नसले तरी झाडं, फुलांचे फोटो शेअर करताना दोघांनी लोकेशन लिहिलं आहे.

वैष्णवी कल्याणकर इ्स्टाग्राम स्टोरी
किरण गायकवाड इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, किरण गायकवाडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘चौक’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आलं. देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ चित्रपटात किरण गायकवाडसह अभिनेता शुभंकर एकबोटे, प्रवीण तरडे, उमेंद्र लिमये, अक्षय टंकसाळे, संस्कृती बाळगुडे असे बरेच कलाकार झळकले होते. त्यानंतर किरण ‘आंबट शौकिन’, ‘नाद’ या चित्रपटात पाहायला मिळाला. लवकरच किरणने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच किरणचं ‘दर्याचं पाणी’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं आहे. याची सध्या चर्चा सुरू आहे.

तसंच वैष्णवी कल्याणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनेदेखील ‘देवमाणूस’ मालिकेत काम केलं होतं. याच मालिकेदरम्यान किरण आणि तिची भेट झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली होती.