‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड सध्या वैवाहिक जीवन एन्जॉय करताना दिसत आहे. गेल्यावर्षी १४ डिसेंबरला किरण गायकवाडचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरणने लग्नगाठ बांधली. या लग्नासोहळ्याला ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आज किरणची बायको वैष्णवीचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता किरण गायकवाडने वैष्णवी कल्याणकरबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “हॅप्पी बर्थडे बायको…खूप खूप प्रेम…बाकी तर तुला माहितीच आहे”, असं सुंदर कॅप्शन लिहित अभिनेत्याने बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच किरणने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालला पाठिंबा देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचला एल्विश यादव, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देत म्हणाला, “डंके की चोट पे…”

“खूप प्रेम वैष्णवी”, असं लिहित किरणने केकचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्याने खास बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने साडीचा केक आणल्याचं दिसत आहे. या साडीच्या केकवर ‘बायको’ असं लिहिलं आहे. वैष्णवीच्या वाढदिवसाच्या या केकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

किरण गायकवाड इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – “तब्बल ९० दिवसानंतर मिळणारं पेमेंटही…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाला…

किरण गायकवाडने बायकोसाठी केलेल्या खास पोस्टवर चाहत्यांनी वैष्णवीला शुभेच्छा दिल्या आहेत. “हॅप्पी बर्थडे मिसेस गायकवाड”, “आईला दोघांची दृष्ट काढायला सांगा”, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा वहिनी”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – ‘झी मराठी’च्या नव्या थ्रिलर मालिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी! तर, खलनायिका साकारणार…; प्रोमोत दिसली संपूर्ण स्टारकास्ट

दरम्यान, किरण गायकवाडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकेनंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus fame kiran gaikwad share special post for wife vaishnavi kalyankar on her birthday pps