Kiran Gaikwad Wedding: ‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिका ‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’मधून घराघरात पोहोचलेला किरण गायकवाड लग्नबंधनात अडकला आहे. किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे सध्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशातच किरण गायकवाडच्या वरातीचा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण गायकवाडच्या वरातीचा व्हिडीओ अभिनेता अमरनाथ खराडेने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमरनाथने किरणबरोबर ‘लागिरं झालं जी’ मालिकेत काम केलं होतं. दोघं खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे अमरनाथ इन्स्टाग्रामवर किरणच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण शेअर करताना दिसत आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: पाच नॉमिनेटेड सदस्यांपैकी ‘हा’ स्पर्धक १०व्या आठवड्यात गेला घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

“भावाची वरात” असं कॅप्शन देत अमरनाथ खराडेने किरणच्या वरातीतला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मराठी कलाकार जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये अमरनाथसह निखिल चव्हाण, सुमीत पुसावळे, महेश जाधव, राहूल मगदुम आणि पूर्वा शिंदे किरणच्या वरातीत भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहेत. तसंच किरणही घोड्यावर बसून डान्स करताना दिसत आहे. किरणच्या वरातीचा हा व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला आहे. लग्नासाठी किरणने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि फेटा घातला आहे.

हेही वाचा – Video: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवोदित कवयित्री म्हणून सन्मान, पोस्ट करत म्हणाली, “हे दुर्मिळ…”

हेही वाचा – Video: रांझना हुआ मैं तेरा…; ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरचा संगीत सोहळ्यात रोमँटिक डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरचा पार पडला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. किरण आणि वैष्णवी यांची पहिली भेट ‘देवमाणूस या मालिकेच्या सेटवर झाली आणि इथे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, किरण सध्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus fame kiran gaikwad wedding amarnath kharade nikhil chavan sumeet pusavale mahesh jadhav dance in varat pps