‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी लग्न बंधनात अडकली आहे. तिने गुपचूप लग्न उरकलं आहे. १३ डिसेंबरला देवोलीनाच्या हळदी व मेहंदीचे फोटो समोर आले होते. तर १४ डिसेंबर रोजी तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती नववधूप्रमाणे सजलेली दिसत आहे. पण तिच्या या फोटोंमध्ये तिचा पती कोण आहे, याबाबतचा खुलासा तिने केलेला नाही. अशातच आता तिचा पती कोण आहे, याबद्दल माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, देवोलीनाने शाहनवाज शेखबरोबर लग्न केलंय. शाहनवाज शेख हा जिम ट्रेनर आहे. बिग बॉस १३ च्या दरम्यान देवोलिना भट्टाचार्जीने सांगितले होते की ती घराबाहेर कोणाला तरी डेट करत आहे. मात्र ती व्यक्ती कोण हे तिने सांगितलं नव्हतं. देवोलीना आणि शाहनवाज यांची भेट अभिनेत्रीच्या घराजवळ असलेल्या जिममध्ये झाली होती. साथियाच्या सेटवर देवोलीनाचा अपघात झाला होता. यादरम्यान शाहनवाजने तिला खूप सांभाळून घेतलं, तो तिचा आधार बनला आणि ती बरी झाली. शाहनवाजच्या या काळजी घेणाऱ्या स्वभावाने देवोलीनाचे मन जिंकले. यानंतर दोघांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केले आणि आता लग्न केल्याची चर्चा आहे.

छोट्या पडद्यावरील ‘गोपी बहू’ने गुपचूप उरकलं लग्न, नवऱ्याचं नाव व चेहरा दाखवण्यास दिला नकार, म्हणाली…

दरम्यान, देवोलीना आणि अभिनेता विशाल सिंह दोघेही चांगले मित्र आहेत. त्यांचा बॉन्ड पाहून असं वाटलं होतं की ते एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्यांच्यात केवळ मैत्री असल्याचे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केले होते. देवोलीनाच्या लग्नातही विशाल सिंह अनेक फोटोंमध्ये एका चांगल्या मित्राप्रमाणे तिच्या प्रत्येक पावलावर तिच्याबरोबर होता.

देवोलीनाने अजून तिच्या पतीबद्दल चाहत्यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. पण तिने शाहनवाजशी लग्न केल्याचं म्हटलं जातंय. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवोलीनाने तिच्या लग्नाबाबत भाष्य केलं. देवोलीनाचे नववधूच्या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. याचबाबत तिला विचारलं असता देवोलीना म्हणाली, “माझा पती कोण आहे हे सध्या गुपितच राहू द्या. वेळ आल्यावर मी सगळं काही सांगेन.”