टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने डिसेंबर २०२२ मध्ये तिचा बॉयफ्रेंड शानवाज शेखशी लग्नगाठ बांधली. शानवाज तिचा जिम ट्रेनर होता, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. पण या आंतरधर्मीय लग्नामुळे देवोलीनाचा भाऊ खूश नव्हता. पण आता रक्षाबंधनाला दोघांमधील मतभेद दूर झाले आहेत. देवोलीनाने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे.

४१ वर्षांच्या संसारानंतर आंतरधर्मीय लग्नाबाबत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मला हिंदू असलेल्या रत्नाशी…”

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

देवोलीना भट्टाचार्जीने सांगितलं की तिचा भाऊ अनदीपबरोबरचे तिचे नाते आता चांगले झाले आहे. ती पहिल्यांदाच तिच्या भावाबरोबरच्या नात्याबद्दल मीडियासमोर बोलली आहे. ती ‘ईटाईम्स’ला म्हणाली, “मला माहीत आहे की तो त्यावेळी नाराज होता. मी त्याची नाराजी समजू शकते. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की वेळ हाच सर्व गोष्टींवर एकमेव उपाय आहे. भाऊ-बहिणींना एकमेकांच्या रागाची जाणीव असतेच. शेवटी आम्ही दोघेही एकमेकांचा आधार आहोत आणि हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. देवाच्या कृपेने आता आमच्यात सर्व काही ठीक आहे.”

देवोलीना पुढे म्हणाली, “मला वाटतं की लोक सोशल मीडियावर इतके वरचढ झाले आहेत की ते फॉलोइंगच्या आधारे कोणत्याही नात्यांबद्दल बोलू लागले आहे. मला वाटतं की हा मुर्खपणा आहे. जेव्हा आपण सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत असतो तेव्हाच आपलं नातं असतं का? आपण आता मोठं व्हायला पाहिजे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की नकारात्मकता आणि नकारात्मक लोकांनी आमच्या आयुष्यातून दूर राहावं आणि स्वतःचं काम करावं. हे माझे कुटुंब आहे आणि मला माझी नाती कशी जपायची, हे चांगलंच माहीत आहे.”