देवोलिना भट्टाचार्जी मागच्याच आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकली. देवोलिनाने बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी गुपचूप लग्न उरकलं. तिच्या लग्नाचं वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या दोघांचा विवाहसोहळा लोणावळा येथे पार पडला. देवोलिना आणि शाहनवाज यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यांच्या या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. आता देवोलिनाने लग्नाचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

देवोलिनाने कोर्ट मॅरेजचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये देवोलिना आणि तिचा पती शाहनवाज शेख मजिस्ट्रेटसमोर लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या करताना दिसत आहेत. त्यानंतर दोघंही एकमेकांना अंगठ्या आणि वरमाला घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना देवोलिनाने एक लांबलचक नोट लिहिली आहे. या नोटमधून तिने शाहनवाजचे आभार मानले आहेत.

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
joe biden elon musk
Video: “मला ‘गे’ म्हणाले नी आता पार्श्वभागावर ‘चापट’ मारायचीय”, जो बायडेन यांची एलॉन ‘मस्क’री!
Bigg Boss Marathi Season 5 fame irina rudakova dance on Nagada Sang Dhol song
Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”
madhuri dixit reveals secret of happy marriage
भावामुळे ओळख, कॅलिफोर्नियात लग्न अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरी दीक्षितने सांगितलं सुखी संसाराचं गुपित, म्हणाली…
Sunny Leone and Daniel Weber renewed their wedding vows
अभिनेत्री सनी लिओनीने डॅनियलशी पुन्हा केलं लग्न, तिन्ही मुलांची उपस्थिती, फोटो आले समोर
yash dance with his daughter
Video : ‘केजीएफ’ फेम यशचा लोकप्रिय गाण्यावर लेकीबरोबर जबरदस्त डान्स; त्याच्या पत्नीने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने वेधले लक्ष
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

आणखी वाचा- “माझी मुलं मुस्लीम…” बॉयफ्रेंड शाहनवाजशी लग्नगाठ बांधल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना देवोलिनाचं सडेतोड उत्तर

देवोलिनाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “१४.१२.२०२२. फक्त प्रेम, जेव्हा कोणीही मी ठीक आहे की नाही हे विचारण्याची तसदी घेतली नाही त्यावेळी माझ्याबरोबर राहण्यासाठी धन्यवाद शोनू. मला जसा हवा होता तसा अनुभव देण्यासाठी धन्यवाद. प्रेम, सुरक्षा आणि काळजी घेण्यासाठी धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा सन्मान करण्यासाठी आणि मला माझ्या दोषांसह स्वीकारण्यासाठी धन्यवाद.”

आणखी वाचा- “आता तुझी जागा मावशी…” मलायका अरोराबद्दल मुलगा अरहान खानचं मोठं वक्तव्य

आपल्या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, “बरंच काही बोलायचं आहे, पण सध्या एवढंच ठीक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुझे खूप खूप आभार” देवोलिनाने या पोस्टमध्ये बरेच हार्ट आणि आशीर्वादाचे इमोजी वापरले आहेत. देवोलिनाच्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.