छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवेलिना भट्टाचार्जी काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झाली. देवोलिनाने बॉयफ्रेंड शाहनवाजशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे देवोलिनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

देवोलिना शाहनवाजशी विवाहबंधनात अडकल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची तुलना श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आफताबशी केली होती. त्यांच्या लग्नाला लव्ह-जिहाद हा टॅगही नेटकऱ्यांकडून देण्यात आला. आता नेटकऱी देवोलिना व शाहनवाजच्या लग्नाच्या खर्चावरुन त्यांना ट्रोल करत आहेत. शाहनवाजने लग्नासाठी पैसे खर्च न केल्यामुळे देवोलिनाने कोर्ट मॅरेज केल्याचं बोललं जात आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा>>“देवोलिना भट्टाचार्जी अभिजीत बिचुकलेचे कपडे धुवायची”, राखी सावंतचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलासा

लग्नाच्या खर्चावरुन ट्रोल करणाऱ्यांना देवोलिनाने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना ती म्हणाली, “शाहनवाज एक फिटनेस ट्रेनर आहे. फिटनेस क्षेत्रात त्याचं नाव आहे. त्याचा कलाविश्वाशी काहीही संबंध नसला तरी तो त्याच्या कामातून चांगले पैसे कमावतो. त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. जर मी धुमधडाक्यात लग्न केलं असतं, तर ट्रोलर्स मला गोल्ड डिगर म्हणाले असते”.

हेही वाचा>>‘पठाण’च्या वादादरम्यान शाहरुख खानचा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देतानाचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते “तुझ्या आईने…”

“मला सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे काहीही फरक पडत नाही. मी आणि शाहनवाज लोकांच्या बोलण्यापेक्षा आम्ही आमचं आयुष्य, भविष्यकाळ यावर लक्ष केंद्रीत करतो. जर आपण चांगले वागलो तर हे जगही आपल्याशी चांगलेच वागते, असं मला वाटतं”, असंही पुढे देवोलिना म्हणाली.

हेही वाचा>> “तू त्याच्यापासून…”, अपूर्वा नेमळेकरच्या आईने अक्षय केळकरबद्दल केलं मोठं वक्तव्य

देवोलिना ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील ‘गोपी बहू’च्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. देवोलिनाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना विवाहाची बातमी दिली होती. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

Story img Loader