साथ निभाना साथिया मालिकेतून घराघरात पोहोचलेली देवोलिना भट्टाचार्जी नुकतीच विवाहबंधनात अडकली. गोपी बहूने बॉयफ्रेंड शाहनवाजशी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. धर्माने मुस्लीम असलेल्या शाहनवाशी विवाहबद्ध झाल्याने देवोलिनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे नेटकऱ्यांनी देवोलिना व शाहनवाजची तुलना श्रद्धा वालकर प्रकरण व आफताबशी केली होती. शाही विवाहसोहळा न करता कोर्ट मॅरेज केल्यामुळेही देवोलिनाला ट्रोल केलं गेलं होतं. शाहनवाजने लग्नासाठी पैसे खर्च न केल्यामुळे कोर्ट मॅरेज केलं असल्याचं नेटकरी म्हणत होते. आता लग्नाआधीच गरोदर असल्यामुळे देवोलिनाने घाईघाईत लग्न उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
हेही वाचा>>“…म्हणून मी त्यांना चित्रपटात घेतो”, रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांबाबत मोठं वक्तव्य
हेही वाचा>> घट्ट मिठी मारली, प्रपोज केलं अन् नंतर किस…; ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावतंच्या बॉयफ्रेंडची एन्ट्री
देवोलिना लग्नाआधीच गरोदर होती, म्हणूनच तिने गुपचूप कोर्ट मॅरेज केल्याचं नेटकरी म्हणत आहेत. लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चर्चांवर देवोलिनाने मौन सोडत ट्रोलर्सला सुनावलं आहे. ईटाम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य करत ट्रोलर्सला स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.
हेही वाचा>>“छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना रायगडावरुन ऑर्डर…”, शरद पोंक्षेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
देवोलिना म्हणाली, “मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण आजूबाजूला असे काही लोक ज्यांना वाटतं की मी लग्नाआधीच गरोदर होते. म्हणूनच मी गुपचूप लग्न उरकलं. ज्या लोकांनी अशा कमेंट केल्या आहेत, त्यांची विचारसरणी पाहून मला वाईट वाटतं”. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक फिटनेस ट्रेनर आहे. फिटनेस क्षेत्रात त्याचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देवोलिना व शाहनवाज एकमेकांना